टीम इंडिया पुन्हा टी-२० विश्व चषक जिंकणार का?

आयसीसी टी-२० विश्व चषकाचे हे चौथे वर्ष.... यंदा श्रीलंका एकट्याच्या जीवावर ही स्पर्धा आयोजित करीत आहे. या स्पर्धेत डार्क हॉर्स म्हणून वेस्ट इंडिजचं नाव पुढे येत आहे.

प्रशांत जाधव | Updated: Sep 21, 2012, 06:43 PM IST

आयसीसी टी-२० विश्व चषकाचे हे चौथे वर्ष.... यंदा श्रीलंका एकट्याच्या जीवावर ही स्पर्धा आयोजित करीत आहे. या स्पर्धेत डार्क हॉर्स म्हणून वेस्ट इंडिजचं नाव पुढे येत आहे. तसं तज्ज्ञांनी भाकितही व्यक्त केलं आहे. याखेरीज मायदेशात खेळणारी श्रीलंका, माजी गतविजेते पाकिस्तान, आणि गतविजेता इंग्लड आणि तळाला असलेली ऑस्ट्रेलियाही या स्पर्धेत आघाडीवर आहे.
सध्या भारताचा संघही चांगल्या फॉर्मात आहे. भारताची फलंदाजी दमदार आहे. युवराज सिंगच्या आगमनाने भारतीय संघात पुन्हा जान आली आहे. त्यामुळे यंदा आयसीसी टी-२० विश्वचषकवर कोण ताबा मिळवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. भारत पुन्हा एकदा ही ट्रॉफी उंचावणार का?
तुमच्या प्रतिक्रिया आम्हांला 24taas.com वर बातमी खालील प्रतिक्रियांचा बॉक्स मध्ये नोंदवा..