व्यक्त करा तुमच्या भावना...

By Shubhangi Palve | Last Updated: Friday, November 16, 2012 - 02:21

बाळासाहेबांची प्रकृती नाजूक असल्याच्या बातमीनं गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रभर चिंतेचं वातावरण पसरलंय. त्यामुळे रात्री तीन वाजताही बाळासाहेबांच्या हितचिंतकांची गर्दी मातोश्रीबाहेर दिसत होती.
बाळासाहेबांच्या प्रकृतीविषयी बराच वेळ संभ्रामवस्था निर्माण झाली होती. पण, राज आणि उद्धवनं एकत्र येऊन बाळासाहेबांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं आणि शिवसैनिकांच्या जीवात जीव आला. मनसैनिक आणि शिवसैनिकांसह देशभरातून बाळासाहेबांच्या तब्येतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना केली जातेय... होमहवन, महाआरत्या केल्या जात आहेत.
बाळासाहेब इच्छाशक्तीच्या जोरावर या परिस्थितीवरही मात करतील अशी त्यांना आशाच नाही तर खात्री आहे. मित्रांसाठी मित्र आणि शत्रूंसाठीही 'दिलदार शत्रू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाळासाहेबांसाठी तुम्हालाही संदेश द्यायचा असेल, व्यक्त व्हायचं असेल तर तुमच्या भावना तुम्ही ‘झी २४ तास’च्या माध्यमातून इतरांशी शेअर करू शकता... कुणास ठाऊक, कदाचित बाळासाहेबांच्या प्रकृतीत होत असलेल्या सुधारणेमध्ये तुमच्या प्रार्थनेचाही सहभाग असू शकेल...
खाली दिलेल्या रिकाम्या बॉक्समध्ये टाईप करा तुमच्या भावना... द्या बाळासाहेबांसाठी संदेश...

First Published: Thursday, November 15, 2012 - 17:12
comments powered by Disqus