कोण जिंकणार भारत-पाक रणसंग्राम

By Prashant Jadhav | Last Updated: Tuesday, December 25, 2012 - 17:18

www.24taas.com, मुंबई
भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील मैदानावरील खुन्नस पुन्हा एकदा चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. भारत आणि पाक यांच्यातील पहिली टी-२० मॅच बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर आज रंगणार आहे. आशिया कपनंतर प्रथम या दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील प्रतिष्ठेची लढत चाहत्यांना अनुभवयाला मिळणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅचेसमध्ये नेहमीच दोन्ही देशांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते. शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखायला लावणाऱ्या या मॅचेस क्रिकेटप्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरते. आता, आशिया कपनंतर प्रथमच या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये मुकाबला होणार आहे.
तुम्हांला काय वाटते, इंग्लडकडून सपाटून मार खाल्यानंतर टीम इंडिया पुन्हा कमबॅक करेल का, पाक मागील सर्व पराभवांचा वचपा काढणार का?
तुमचे काहीही मत असे तर ते आम्हांला कळवा. प्रतिक्रिया टाइप करण्यासाठी खालील बॉक्सचा वापर करा.

First Published: Tuesday, December 25, 2012 - 17:18
comments powered by Disqus