‘झी २४ तास’ साहित्य जागर

By Prashant Jadhav | Last Updated: Tuesday, January 8, 2013 - 20:41

www.24taas.com, चिपळूण
गेली ८६ वर्षे साहित्याचा महाकुंभ मेळा महाराष्ट्र देशातील विविध शहरांमध्ये भरवला जात आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अनेक दिग्गज लेखक विराजमान झाले आहे. परंतु, काही दिग्गजांना हा मान मिळू शकला नाही. त्या विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, कवी ग्रेस असा अनेकांची आपण जंत्री देऊ शकतो.
साहित्याच्या या महाकुंभात अनेक हौशे गौवशे अध्यक्षपदाची माळ आपल्या गळ्यात पाडू घेतात. सध्याही ज्या लेखकांची पुस्तके प्रसिद्ध आहेत अशा लेखकांना या ठिकाणी निमंत्रण दिले जात नाही. मेघना पेठे असो की अच्युत गोडबोले याच्या साहित्याला तरुण वर्गाकडून खूप मागणी आहे. मात्र अशांना या महाकुंभात स्थान नाही.
साहित्य संमेलनात ज्या लेखकांना स्थान नाही पण तुमच्या लेखी ते खूप छान लेखक आहेत. अशा काही लेखकांची नावे आम्हांला कळवा.
कळवा तुमची तीन आवडती पुस्तकं लेखकांच्या नावासह
तुमचे आवडते पुस्तक आणि लेखकाचे नाव कळविण्यासाठी खालील प्रतिक्रियांच्या बॉक्समध्ये टाइप करा.First Published: Tuesday, January 8, 2013 - 20:41


comments powered by Disqus
Live Streaming of Lalbaugcha Raja