दिवाळीचा चविष्ठ साहित्यिक फराळ...

दिवाळीच्या आकर्षक साहित्यांनी बाजारपेठा फुलल्या असताना वाचकांसाठी दिवाळीची साहित्यिक भेट म्हणजेच दिवाळी अंक वाचकांसाठी तायर झालेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 10, 2012, 10:53 AM IST

www.24taas.com, मुंबई
दिवाळीच्या आकर्षक साहित्यांनी बाजारपेठा फुलल्या असताना वाचकांसाठी दिवाळीची साहित्यिक भेट म्हणजेच दिवाळी अंक वाचकांसाठी तायर झालेत. दिवाळी अंकांची वर्षानुवर्षाची परंपरा तशीच कायम असून लायब्ररी आणि बुक स्टॉल्समध्ये वाचकांनी दिवाळी अंक घेण्यास गर्दी केलीय.
१०० वर्षाहून अधिक वर्षांची सांस्कृतिक परंपरा पुढे नेत असलेल्या दिवाळी अंकांनी बूकस्टॉल्स सध्या गच्च भरुन घेलेत. रंगबेरंगी कव्हर पेजेस... विविध विषय आणि विनोदी कार्टुन्सनी दिवाळी अंक वाचकांना आकर्षित करत आहेत. हा सगळा खटाटोप करण्यामागे प्रचंड मेहनत आणि कल्पकता आहे. बदलत्या काळानुसार बाजारीकरण वाढलं असलं तरी दिवाळी अंक ही संस्कृती जोपासण्याचाही प्रयत्न कायम आहे.
यंदा जवळपास ८०० हून अधिक दिवाळी अंक उपलब्ध आहेत. वर्षानुवर्षे चालत आलेले अक्षर, यथश्री, धनंजय, आवाज आदी दिवाळी अंक सोडले तर यंदा काही नवीन दिवाळी अंकांनाही वाचकांकडून पसंती मिळत असल्याचं दिसून येतंय. यंदा दिवाळी अंकांच्या किंमती १०० ते १५० रुपयांच्या घरात आहेत. मात्र, तरीही वाचनासाठी आसुसलेला वाचक दिवाळीचा हा साहित्यिक फराळ विकत घेताना दिसतोय. सध्या इंटरनेटचा जमाना असला तरी वाचकांची दिवाळी अंकांची आवड आणि उत्सुकता आजही कायम आहे.