आधुनिक रंगभूमीचं सोनेरी पान – गिरीश कार्नाड (लेख)

महाराष्ट्.. कलावंताची खाण आणि कलेचं माहेरघर.. इथल्या मातीचा कणन कण शोध घेत असतो दुरवरच्या त्या क्षितीजाचा.. आणि मातीचा वारसा खेळतो प्रत्येक महाराष्ट्रीयाच्या नसानसातून..

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Nov 1, 2013, 10:07 PM IST

.

महाराष्ट्.. कलावंताची खाण आणि कलेचं माहेरघर.. इथल्या मातीचा कणन कण शोध घेत असतो दुरवरच्या त्या क्षितीजाचा.. आणि मातीचा वारसा खेळतो प्रत्येक महाराष्ट्रीयाच्या नसानसातून.. महाराष्ट्राचा इतिहास संपन्न केलाय तो याच मातीच्या भूगोलानं.. असंच एक महाराष्ट्रातलं गाव म्हणजे माथेरान.. थंड हवेचे ठिकाण म्हणून विश्वविख्यात असलेल्या या गावातला १९ मे१९३८ ला एक वादळ जन्माला आलं.. शाळकरी वयात पठारावरुन दऱ्यांमध्ये आपल्याच आवाजाचा प्रतिध्वनी शोधताना तो आवाज डोगरपल्याड अगदी सिमापल्याड गेला.. आणि सामाजिक स्थित्यंतराच्या आणि मानवी कल्लोळाला त्या वादळाचा जणू आधार मिळाला.. मेंदूच्या कल्लोळाला आणि बेभान झालेल्या सामाजिक वेगाला आवर घातला तो याच वादळानं.. आणि त्या वादळाचं नाव होतं.. गिरीश रघुनाथ कार्नाड..

तो सुमार १९४०चा होता.. स्वातंत्र्याचे धुमारे फुटत होते आणि त्याचवेळी मराठी नाटकाच्या सुवर्णपर्वाला ही आरंभ झाला होता. माथेरानमधून विद्यानगरी पुणे येथे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या कार्नाडांच्या आयुष्यात त्याच वेळी मराठी नाटकांची श्रीमंती आली.. लहानपणीच बालगंधर्व आणि किर्लोस्करांसारख्या नाटकमंडळीची नाटक पाहत भरजरी झालेल्या कार्नाडांना नंतर याच फुटलाईटच्या प्रकाशात भारतीय नाटक आपल्याला वास्तवात आणायचं आहे याची त्यावेळी कदाचित कल्पनाही नसेल.. मुळच्या कोकणी कुटूंबातील या तरुणाला मराठीने वेड लावल खर पण तोपर्यंत कर्नाटकात जावं लागलं. कर्नाटकातल्या सिरसीमध्ये शिक्षण घेत असतानाच नाटकवेड्या परिवाराच्या संस्कारामुळे कार्नांडानी यक्षगान प्रकारासाठी तोंडाला रंग फासला आणि त्याचवेळी नभातल्या तारांगणालाही हेवा वाटेल असे एक दैदिप्यमान नक्षत्र रंगमंचावर अवतरलं.. लोकसंस्कृतीचा हाच घट्ट वसा आणि वारसा आजही गिरीश कार्नाड यांच्या लिखाणातून दिग्दर्शनातून आणि अभिनयातूनही समर्थपणे दिसतो. धारवाड विद्यापीठातून मॅथ्येमेटीक्स आणि स्टॅटीक्सच्या या विद्यार्थी असणा-या कार्नांडानी लिंकन क़ॉलेज ऑक्सफर्ड गाठलं आणि पॉलिटिक्स, फिलॉसॉफीमध्ये पारगंत झाले. त्य़ानंतर शिकागो विद्यापीठात प्राध्यापकी करत विद्यार्थ्यांवर संस्कारही केले..
पण नाटक आणि कलेची बाधा ज्याला झाली ना त्याच माणूसपण खेचत राहतं त्याला, एक असीम अशा प्रकाशाकडे.. त्याच प्रकाशात प्रत्येकाला आपल्यातल्या ख-या कलावंताचा शोध लागतो. आणि सुरु होतो कलावंताचा स्वताशीच संघर्ष... तो काळ सत्तरचा होता.. ऑक्सफर्ड युनिवर्सिटीतल्या नोकरीचा राजीनामा देत कार्नाडांनी चेन्नईत आता स्थानिक ऐम्युचर थिएटरसाठी काम करायचं ठरवलं..
कार्नांडानी रंगभूमीसाठी काम करायचं ठरवलं.. पण त्यांच्यातला अभिनेता आणि लेखक यांच्यात व्दंव्द झाल.. कार्नांडानी लेखक म्हणून मातृभाषा कोकणी स्वीकारली नाही की, ज्या भाषेत विचारांना गती मिळाली ती इंग्रजी स्वीकारली नाही.. त्यानी स्वीकारली ती कानडी भाषा.. कार्नांडानी कन्नडमध्ये लिखाणास सुरुवात केली त्या काळी तात्कालीन कन्नड लेखकांवर आणि कन्नड साहित्यावर पाश्चिमात्यांचा प्रभाव होता. कार्नांडानी प्रवाहाच्या विरुद्ध झोकून द्यायचे ठरवले आणि त्यांच्या मदतीला धावून आली ती यक्षगानची पात्रसंस्कृती.. वयाच्या २३व्या वर्षी कार्नांडानी सामाजिक बदलांना नाट्यपरावर्तीत करायचं ठरवल आणि त्यासाठी ऐतिहासिक पात्र आणि मिथकांचा वापर करत त्यांनी कन्नड रंगभूमीला एका वेगळ्या उंचीवर जावून ठेवल.. महाभारतातल्या असंख्य पात्रांपैकी एक असलेला ययाती, कार्नांडाच्या लेखणीतून साकारला आणि कन्नड रंगभूमीनं त्याला सम्राटपद दिलच.. आणि या सार्वभौमानं अनुवादीत होत मराठीसह इतर भाषांमध्ये उतरत रसिक मनांवर अधिराज्य केलं.. आणि ते आजही चिरतरुण आहे ययातीच्या तारुण्याएवढच...
तत्कालीन सामाजिक माणसांची घुसमट आणि इतिहासाची सांगड हे सगळ काहीतर वेगळच होत.. पण तो पर्यत वयाच्या २७ व्या वर्षी गिरीश कार्नांडानी, जी व्यक्तीरेखा कुंचल्यातून साकारण कठीण ती आपल्या लेखणीनं लिलया रेखाटली. कार्नांडांचे तुघलक रंगभूमीवर आलं आणि प्रयोगणिक या तुघलकांनं रसिकाची काळीजं अक्षरक्ष लुटली... इब्राहिम अल्काझी आणि दिनेश ठाकूर या कलावंतानी तुघलकाला दिल्लीत एनएसडीत पुन्हा सत्ताधिश बनवलं..
मस्तक बदलांच्या खेळाला कार्नाडांनी नाव दिलं हयवदन.. आणि यक्षगानशी प्रेरणा घेऊन आलेला हा प्रकार विजया मेहता नावाच्या अनुभव संपन्न दिग्दर्शिकेच्या हाती लागला आणि प्रयोगागणिक