आरोग्य विद्यापीठातील 'मुन्नाभाई'

Last Updated: Friday, February 24, 2012 - 19:57

 www.24taas.com, नाशिक

 

स्टाफरुममधून 9 जणांच्या उत्तरपत्रिका चोरुन पुन्हा लिहल्याचा प्रकार नाशिकमध्ये उघड झाला आहे. नाशिकच्या आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षा विभागात हा प्रकार घडलाय. या उत्तरपत्रिका चोरुन पुन्हा लिहून जमाही करण्यात आल्यात. एका तपासनिसाच्या लक्षात आल्यानं या धक्कादायक प्रकार उघड झाला.

 

MBBSच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी हे कृत्य केल्याचं समजतंय. ज्या उत्तरपत्रिकांमधली उत्तर सारखीच आढळल्यानं हा सगळा प्रकार समोर आलाय. या सा-या प्रकाराबाबत परीक्षा विभाग मात्र अनभिज्ञ असल्याचं समोर आलंय. दरम्यान याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 4-5 कंत्राटी कर्मचा-यांना अटक करण्यात आली.

 

 

First Published: Friday, February 24, 2012 - 19:57
comments powered by Disqus