एमपीएससीचं वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २०१२ साली घेण्यात येणा-या विविध स्पर्धा परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय लोकसेवा दरवर्षी संपूर्ण वर्षाचे वेळापत्रक वर्षाच्या सुरुवातीला देण्यात येत आहे.

Updated: Oct 20, 2011, 06:54 AM IST

झी 24 तास वेब टीम, मुंबई

 

 

 

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २०१२ साली घेण्यात येणा-या विविध स्पर्धा परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय लोकसेवा दरवर्षी संपूर्ण वर्षाचे वेळापत्रक वर्षाच्या सुरुवातीला देण्यात येत आहे.

 

राज्यसेवा परीक्षा

 

जाहिरात प्रकाशित/अर्ज भरणं - डिसेंबर २०११

पूर्व परीक्षा -१२ फेब्रुवारी २०१२ (वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी)

मुख्य परीक्षा - १५ मे २०१२ पासून (लेखी परीक्षा)

पात्रता : अंतिमवर्ष पदवी किंवा पदवी प्राप्त उमेदवार

 

पोलीस उपनिरीक्षक परीक्षा

ही परीक्षा पूर्वपरीक्षा, मुख्यपरीक्षा, शारीरिक चाचणी व मुलाखत या टप्प्यांतून होते.

जाहिरात प्रकाशित/अर्ज - फेब्रुवारी

पूर्वपरीक्षा - २२ एप्रिल २०१२ (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी)

मुख्यपरीक्षा - २२ जुलै २०१२ (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी)

पात्रता : पदवीच्या अंतिम वर्षाला असणारे वा पदवी उत्तीर्ण उमेदवार

 

विक्रीकर निरीक्षक

राज्य शासनाच्या उत्पन्नचा मोठा भाग म्हणजे विक्रीकर.

जाहिरात प्रकाशित/अर्ज - मार्च २०१२

पूर्वपरीक्षा - १३ मे २०१२ (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी)

मुख्यपरीक्षा - १९ ऑगस्ट २०१२ (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी)

पात्रता : अंतिम वर्ष पदवी वा पदवी उत्तीर्ण उमेदवार

 

सहाय्यक परीक्षा

जाहिरात प्रकाशित/अर्ज - एप्रिल २०१२

पूर्वपरीक्षा - १७ जून २०१२

मुख्यपरीक्षा - ९ सप्टेंबर २०१२

पात्रता : वरीलप्रमाणे

 

महाराष्ट्र वनसेवा परीक्षा

या परीक्षेसाठी लेखी परीक्षा (गुण - ८००) व मुलाखत (गुण-१००) असे तीन टप्पे आहेत. मुख्य परीक्षेत मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान-गणित व दोन वैकल्पिक विषयांचा समावेश असतो.

जाहिरात प्रकाशित/अर्ज - नोव्हेंबर २०११

परीक्षा - १५ जानेवारी २०१२

पुढीलपैकी एका विषयातील पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक रसायनशास्त्र, वनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, संख्याशास्त्र, प्राणीशास्त्र.

 

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (गट अ)

जाहिरात अर्ज - नोव्हेंबर २०११

पूर्वपरीक्षा - जानेवारी २०१२

मुख्यपरीक्षा - एप्रिल २०१२

 

पात्रता : अभियंत्रिकी पदवीधर

दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर व प्रथम वर्ग न्यायाधीश परीक्षा

जाहिरात - जुलै २०१२

पूर्वपरीक्षा - सप्टेंबर २०१२

मुख्यपरीक्षा - डिसेंबर २०१२

 

कायद्याची पदवी (किमान ५५ )

पात्रता : इंग्रजी आणि मराठीचे उत्तम ज्ञान

 

अधिक माहितीसाठी www.mpsc.gov.in ही वेबसाईट पहावी.