नवी मुंबईत अनधिकृत शाळांचं पेव

Last Updated: Thursday, May 24, 2012 - 09:47

स्वाती नाईक, www.24taas.com, नवी मुंबई

 

नवी मुंबई महापालिका शिक्षण मंडळानं चौदा अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे यातल्या तेरा शाळा मागच्या वर्षीही अनधिकृत शाळांच्या यादीमध्ये होत्या. मात्र त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली गेली नाही. या शाळांवर राज्य सरकार कारवाई करणार की महापालिका, या गोंधळात त्यांच्यावर दंडच आकारला गेलेला नाही. परिणामी अनधिकृत शाळांची संख्याही वाढत चालली आहे.

 

महापालिकेच्या शिक्षण मंडळानं यावर्षीही चौदा अनधिकृत शाळांची यादी जाहीर केलीय. त्यात मराठी आणि हिंदी माध्यमाच्या प्रत्येकी दोन तर इंग्रजी माध्यमाच्या दहा शाळांचा समावेश आहे. या शाळांवर शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे.

 

 1. गोठवलीतली ओमसाई एज्युकेशन ट्रस्ट ऍपेक्स स्कूल,
 2. कोपरखैरणतल्या गुरूदास सेवा समिती ट्रस्ट भारतीय जागरण स्कूलची मराठी शाळा,
 3. गुरूदास सेवा समिती ट्रस्ट भारतीय जागरण स्कूलची हिंदी शाळा
 4. गुरूदास सेवा समिती ट्रस्ट भारतीय जागरण स्कूलची इंग्रजी शाळा
 5. श्री साई ज्योती इंग्रजी स्कूल,
 6. कोपरखैरणेतली श्री गणेश एज्युकेशनची इंद्रायणी इंग्लिश मिडीयम स्कूल,
 7. सानपाड्यातली गुरूदत्त सेवा न्यू सिटी इंग्रजी स्कूल,
 8. शिरवणेतील श्रीराम हिंदी विद्यालय,
 9. गुडविल इंग्लिश स्कूल,
 10. नेरूळमधील सेंट झेविअर्स ट्रस्टची मराठी शाळा,
 11. राईट वे इंग्लिश स्कूल,
 12. होम ऑफ पीस फाऊंडेशन एडन स्कूल,
 13. स्वातंत्र्यसैनिक मारूती काळे इंग्रजी स्कूल
 14. बेलापूरमधली रेड क्लिफ फाऊंडेशनचं नॉलेज सेंटर

 

या चौदा शाळा अनधिकृत असल्याचं घोषित करण्यात आलंय. पालिकेच्या शिक्षण मंडळानं कारवाईचा इशारा दिलाय. मात्र कारवाई होत नसल्यानं या शाळा शिक्षण मंडळाला जुमानत नसल्याचं चित्र आहे.

First Published: Thursday, May 24, 2012 - 09:47
comments powered by Disqus