विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई?

प्राध्यापक संघटना अनेक केंद्रांवर प्रॅक्टिकल परीक्षा बंद पाडत आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांना मनस्ताप होतोय. विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल बंद पाडणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाईची मागणी युवासेनेनं केलीय.

Updated: Mar 7, 2013, 03:29 PM IST

www.24taas.com, मुंबई
प्राध्यापक संघटना अनेक केंद्रांवर प्रॅक्टिकल परीक्षा बंद पाडत आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांना मनस्ताप होतोय. विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल बंद पाडणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाईची मागणी युवासेनेनं केलीय.
राज्यातल्या आठ विद्यापीठांमधील प्राध्यापकांनी महाविद्यालयीन परीक्षांवर टाकलेल्या बहिष्कारामुळं अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्यात. टीवायबीएसस्सीच्या पॅक्टिकलच्या ७७ केंद्रांवर आत्तापर्यंत परीक्षा होऊ शकल्या नाहीत. आज दादरच्या रुपारेल महाविद्यालयात टीवायबीएसएस्सीची प्रॅक्टीकलही होऊ शकली नाही. आज एकूण ८४ केंद्रांवर प्रॅक्टिकल परीक्षा होणार आहेत. तर एफवाय आणि एसवायच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्यात. त्यामुळं लाखो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालाय.

प्राध्यापकांच्या हेकेखोर वृत्तीमुळं विद्यार्थी वेठीला धरले जातायेत. त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना आहे.