इयत्ता 7वी ते 10वीच्या नव्या अभ्यासक्रमाचा मसुदा तयार, सूचना-तक्रारी करा

इयत्ता सातवी ते दहावीपर्यंतचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. तसेच पाठांतर करून परीक्षेत विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे लिहा या पारंपरिक शिक्षण पद्धत बदल करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सातवी ते दहावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Updated: Nov 25, 2016, 09:13 AM IST
इयत्ता 7वी ते 10वीच्या नव्या अभ्यासक्रमाचा मसुदा तयार, सूचना-तक्रारी करा title=

मुंबई : इयत्ता सातवी ते दहावीपर्यंतचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. तसेच पाठांतर करून परीक्षेत विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे लिहा या पारंपरिक शिक्षण पद्धत बदल करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सातवी ते दहावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 

नव्या अभ्यासक्रमाचा मसुदा बालभारतीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. याविषयी तक्रारी तसेच सूचना नोंदविण्याची मुदत उद्या २५ नोव्हेंबरपर्यंतच होती, ही मुदत आता ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

नव्या मसुद्यात शब्दसंपत्तीचा विकास, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, स्वयंअध्ययन, चिकित्सक वृत्ती, निरीक्षण, निर्णय क्षमता, जबाबदार नागरिकत्वाचे भान, उद्योग-व्यवसायाशी निगडित शिक्षणावर भर देण्यात आला आहे. बालबालरीतच्या संकेतस्थळावर नवीन अभ्यासक्रमाचा मसुदा सर्वांसाठी खुला आहे. 

इयत्ता सातवी, आठवी, नववी आणि दहावीच्या वर्गांसाठी अभ्यासक्रमाचे आराखडे, त्यांची उद्दिष्टे आणि अभ्यासक्रम बदलाचा अपेक्षित परिणाम याची माहिती देण्यात आली आहे. मराठी, हिंदी, गणित, सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र या प्रमुख विषयांसह द्वितीय आणि तृतीय भाषा विषयांच्या अभ्यासक्रमाचे आराखडे वेबसाईटवर उपलब्ध आहे.