मुंबईतील कॉलेज तरुणीचा ड्रग पेडलरशी व्हाटस् अॅपवरुन संवाद

कॉलेजमध्ये जाणा-या तुमच्या मुलांकडे डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवा. हे आम्ही का सांगतोय. एक रिपोर्ट...तुमची मुलं काय करतात तुमच्या मुलांवर तुमचं लक्ष आहे का? तुमची मुलं नक्की कॉलेजच्या फेस्टिवल्सनाच जातात ना?

Updated: Dec 11, 2014, 10:38 PM IST
मुंबईतील कॉलेज तरुणीचा  ड्रग पेडलरशी व्हाटस् अॅपवरुन संवाद title=

मुंबई : कॉलेजमध्ये जाणा-या तुमच्या मुलांकडे डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवा. हे आम्ही का सांगतोय. एक रिपोर्ट...तुमची मुलं काय करतात तुमच्या मुलांवर तुमचं लक्ष आहे का? तुमची मुलं नक्की कॉलेजच्या फेस्टिवल्सनाच जातात ना?

हे सगळे प्रश्न पुन्हा विचारण्याची वेळ आलीय कारण एक हादरवून टाकणारी घटना मुंबईत घडलीय. अंधेरीतल्या एका कॉलेज परिसरात ड्रग पेडलरला डी.एन.नगर पोलिसांनी अटक केली. हा प्रकार अतिशय नाट्यमय पद्धतीनं समोर आला. ड्र्ग पेडलरशी व्हॉटसऍप आणि एसएमएसच्या माध्यमातून झालेला संवाद एका विद्यार्थिनीच्या आईनं पाहिला. त्या मुलीचा पाठलाग करण्यात आला आणि ड्रग पेडलरला ड्रग विकायला आला असताना पकडण्यात आलं.

ड्रग पेडलरला पकडण्यात आलं.पण त्याहीपेक्षा धक्कादायक गोष्ट म्हणजे कॉलेजमध्ये फेस्टिवल सुरू असताना हे ड्रग विकण्याचा डाव होता. विद्यार्थ्यांचा ड्रग पेडलरशी संपर्क कसा होतो, याची गोष्ट तर आणखी धक्कादायक आहे.

या ड्रगपेडलरकडून १८ ग्रॅम मेथ ड्रग पकडण्यात आलंय. मेथ म्हणजे मेथअॅम्फिटामाईन. साधारणपणे खडीसाखरेसारखं हे ड्रग दिसतं. पाण्यात किंवा दारुमध्ये मेथ सहज विरघळतं. या मेथमुळे खूप दिवस नशेत राहाता येतं. मेथच्या सेवनामुळे वजन कमी होतं, डिप्रेशन येतं आणि महत्त्वाचं म्हणजे आयुष्य कमी होतं.

अंधेरीच्या कॉलेज परिसरातला हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. ड्रग्जचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चाललाय. त्यातून तरुणांना वेळीच बाहेर काढायला हवं. मोरल ऑफ द स्टोरी इज. तुमच्या मुलांवर कृपया नीट लक्ष ठेवा, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.