इंजिनिअरिंग पेपर घोटाळा : दोघांना निलंबित, १३८ कर्मचाऱ्यांची बदली

मुंबई विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग पेपर घोटाळ्याप्रकरणी दोघांना निलंबित करण्यात आलंय. तर तब्बल १३८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 

Updated: May 24, 2016, 08:45 AM IST
इंजिनिअरिंग पेपर घोटाळा : दोघांना निलंबित, १३८ कर्मचाऱ्यांची बदली title=

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग पेपर घोटाळ्याप्रकरणी दोघांना निलंबित करण्यात आलंय. तर तब्बल १३८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 

त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या परीक्षाभवनात मोबाईलवर बंदी घालण्यात आली आहे. सोमावरी झालेल्या मॅनेजमेंट कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

भांडूपमध्ये फुटलेल्या इंजिनिअरिंगचे पेपरसंदर्भात घोटाळ्याचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणीही मॅनेजमेंट कौन्सिल द्वारे करण्यात येणार आहे. शिवाय परीक्षा भवनातल्या सुरक्षा यंत्रणेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावपरही बैठकीत एकमत झालं.  

याप्रकरणी पोलिसांनी ८ जणांना अटक केलीय.  इंजिनिअरिग सोबतच इतर शाखामध्येही असा घोटाळा आहे का याविषयीचा तपास सध्या सुरू आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागतले कर्मचारी सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत.