Exclusive– पाहा MHT-CET निकाल

इंजिनीअरिंग आणि मेडिकल सीईटीचे निकाल उद्या सकाळी जाहीर होणार असून आज टॉपर्सची यादी जाहीर करण्यात आली....त्यात मेडिकल सीईटीमध्ये जालन्याच्या माधवी इंदानी हिनं 198 गुणांसह पहिला क्रमांक पटकावला....

Updated: Jun 9, 2012, 05:23 PM IST

इंजिनिअरींग सीईटीत पुष्कर नरशीकर पहिला

 

 

www.24taas.com, मुंबई

 

एमएचटी-सीईटीचा (MHT-CET)  निकाल  जाहीर करण्यात आला आहे. डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.डीएमईआर.ऑर्ग, डब्ल्यूडब्ल्यूडॉट.एमएचटीसीईटी2012.ऑर्ग,  आणि डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.डीटीई.ऑर्ग.इन  या वेबसाईटवर हे निकाल पाहता येणार आहेत. मात्र विद्यार्थ्यांना गुणपत्रिका १४ जूनला मिळणार आहेत.

 

इंजिनीअरिंग आणि मेडिकल सीईटीचे निकाल उद्या सकाळी जाहीर होणार असून आज टॉपर्सची यादी जाहीर करण्यात आली....त्यात मेडिकल सीईटीमध्ये जालन्याच्या माधवी इंदानी हिनं 198 गुणांसह पहिला क्रमांक पटकावला....

 

 पाहा या लिंकवर सीईटीचा निकाल 

 

यशवंत कॉलेजचा सुमित धुळशेट्टी दुसरा तर याच कॉलेजची श्रद्धा सोमानी यांनी 197 गुणांसह तिसरी आलीय... मुंबईच्या वझे कॉलेजच्या करी मुस्तफानं 195 गुणांसह चौथा क्रमांक पटकावलाय....

 

इंजिनीअरिंग सीईटीत लातूरच्या राजर्षि शाहू कॉलेजच्या पुष्कर नरशीकरनं 196 गुणांसह पहिला क्रमांक पटकावला.... मुंबईच्या मिठीबाई कॉलेजची भैरवी मेहता 195 गुणांसह दुसरी आणि मुंबईच्या भाटिया ज्युनिअर कॉलेजचा सागर पटेल तिसरा आला....

 

पाहा तुमचा  निकाल  या वेबसाईटवर  www.dmer.org,  www.mhtcet2012.org,  www.dte.org.in या तिन्ही वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे.

--------------------------------

सीईटमध्ये ‘ग्रेस मार्क’ नाहीच मिळाले…

दुर्गम भागात रुग्णांची सेवा करणार्‍या डॉक्टरांना दिल्या जाणार्‍या १० ते ३० ‘ग्रेस’ मार्कांचा ‘सीईटी’ उत्तीर्ण होण्यासाठी उपयोग करता येणार नाही.

 

--------------------------------