जेईईच्या धर्तीवर इंजिनिअरींगची सीईटी?

जेईईच्या धर्तीवर इंजिनिअरींगची सीईटी होण्याची शक्यता आहे. २०१८ पासून सीईटीचा अभ्यासक्रम बदलण्याची शक्यता आहे. 

Updated: Nov 8, 2016, 07:14 PM IST
जेईईच्या धर्तीवर इंजिनिअरींगची सीईटी? title=

मुंबई : जेईईच्या धर्तीवर इंजिनिअरींगची सीईटी होण्याची शक्यता आहे. २०१८ पासून सीईटीचा अभ्यासक्रम बदलण्याची शक्यता आहे. 

जेईईप्रमाणेच सीईटीचा अभ्यासक्रम करावा याची तंत्रशिक्षण विभागाच्या बैठकीत चर्चा झाली. तसा प्रस्ताव उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडे पाठवला आहे.
 
नीटचा निर्णय ऐनवेळी झाल्यानं वैद्यकीय विद्यार्थ्यांना फटका बसला होता. तसं पुन्हा होऊ नये म्हणून जेईईप्रमाणे इंजिनिअरींग एमएचटी सीईटीचा अभ्यासक्रम असावा असा प्रस्ताव नुकताच डिटीईने उच्च शिक्षण विभागाला दिला आहे.