परीक्षाचं चाललयं तरी काय?

Last Updated: Wednesday, May 1, 2013 - 12:37

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
एमकॉमची परीक्षा २ मे ऐवजी ५ मे रोजी होण्याचे विद्यापीठाने तूर्तास जाहीर केले आहे. परंतु सीएच्या परीक्षांमुळे ही तारीखही पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सीए फायनल आणि एमकॉमची परीक्षा एकाच दिवशी येत असल्यामुळे विद्यापीठाने एमकॉमची परीक्षा पुढे ढकलण्य़ाचा निर्णय घेतला होता. १५ मेपर्यंत सीएसाठीच्या आयपीसीच्या परीक्षा असल्याने एमकॉमची परीक्षा असल्याने एमकॉमची परीक्षा १५मे नंतरच घेण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

२ मे रोजी होणारी सीए फायनल आणि १८ मे रोजी होणारी एमपीएससी परीक्षा यामुळे विद्यापीठ आपल्या परीक्षांचे वेळापत्रक बदलणार होते.

First Published: Wednesday, May 1, 2013 - 12:03
comments powered by Disqus