अकरावीचे २१ मेपासून ऑनलाईन अर्ज

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी (अकरावी) ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे लांबच रांग रांगेतून सुटका होणार आहे. २१ मेपासून अकरावीची http://fyjc.in//mumbai ही वेबसाईट सुरू होणार आहे. दहावीचे विद्यार्थी अर्जातील नोंदणी अर्ज भाग १ भरू शकतात.

Updated: May 5, 2012, 04:23 PM IST

www.24taas.com, मुंबई

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी (अकरावी) ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे लांबच रांग  रांगेतून सुटका होणार आहे. २१ मेपासून अकरावीची  http://fyjc.in//mumbai ही वेबसाईट सुरू होणार आहे. दहावीचे विद्यार्थी अर्जातील नोंदणी अर्ज भाग १ भरू शकतात.

दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळांमधून माहितीपुस्तिकांचे वाटप करण्यात आले असून त्याबरोबर लॉगइन आयडीही देण्यात आला आहे. हा लॉगइन आयडी वापरून विद्यार्थ्यांना अर्ज भरता येईल. महिनाभरापूर्वी सरावासाठी ही वेबसाईट सुरू करण्यात आली होती. पण आता विद्यार्थी तसेच शाळा आणि महाविद्यालयांसाठी वेबसाईट सुरू होईल.

अर्जाचे नोंदणी अर्ज भाग १ व पसंतीक्रम भाग २ असे प्रकार आहेत. पहिल्या अर्जात विद्यार्थ्यांना वैयक्तिक माहिती भरावयाची असून दुसर्‍या अर्जात महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरायचे आहेत. दहावीच्या परीक्षेचा बैठक क्रमांक टाकल्यास विद्यार्थ्यांचे गुण आपोआप भरले जाणार आहेत.