'अग्निपरीक्षा' - मिशन मंगळ

Last Updated: Friday, August 3, 2012 - 23:02

www.24taas.com, नवी दिल्ली

 

या ब्रम्हांडात आपण एकटेच आहोत का ? की आणखीही कोणी तरी आहे या ब्रम्हांडातील एखाद्या ग्रहावर ? हा प्रश्न अनंत काळापासून माणसाला नेहमीच सतावत आलायं..त्याचं उत्तर अद्याप मिळालं नसलं तरी नासाने मंगळ ग्रहावर मात्र लक्ष केंद्रीत केलं ... येत्या ६ ऑगस्टला त्यांचं मार्स सायन्स लायब्रोटरी हे मंगळावर उतरणार आहे...पण ते उतरतांना शेवटच्या सात मिनिटांत एका क्षणाची जरी चूक झाली तरी १३ हजार ७०० कोटींचा चुरडा व्हायला वेळ लागणार नाही...असं काय आहे त्या सात मिनिटांत...आणि भारताचं मिशन मंगळ काय आहे, यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न 'अग्निपरीक्षा' मध्ये करण्यात आला आहे.

 

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात नासाने मार्स सायन्स लायब्रोटरी हे मंगळ ग्रहाकडं धाडलं होतं..ते लवकरच मंगळावर उतरणार आहे. पण आता या मोहिमेत भारतही मागे नाही. मंगळाचा अभ्यास करण्यासाठी भारताच्या इस्त्रोने कंबर कसलीय. आकाश संशोधनात अग्रेसर असलेली भारताची इस्त्रो ही संस्था आता मंगळ ग्रहाला गवसणी घालण्याच्या तयारीत आहे..इस्त्रोचा हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प मानला जातोय.. मंगळवार एक स्पेस क्राफ्ट पाठविण्याची इस्त्रोने आता तयारी केली आहे...इस्त्रोचं स्पेस क्राफ्ट मंगळाच्या कक्षेत पोहोचल्यानंतर त्यामार्फत मंगळाचा अभ्यास केला जाणार आहे.

 

नासाने मंगळावर पाठविलेली मार्स सायन्स लॅब्रोटरी ५ ते ६ ऑगस्टच्या दरम्यान मंगळाच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. मात्र इस्त्रोचं स्पेस क्राफ्ट मंगळावर उतरणार नसून ते मंगळा भोवती प्रदक्षिणा घालणार आहे. ते स्पेस क्राफ्ट २०१३च्या ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात पाठवलं जाण्याची शक्यता आहे. तसेच सप्टेंबर २०१४मध्य़े ते स्पेस क्राफ्ट मंगळाच्या कक्षेत पोहोचेल. मंगळाची छायाचित्र घेऊन ते पृथ्वीवर इस्त्रोकडं पाठविण्याचं काम त्या स्पेस क्राफ्टच्या माध्यमातून केलं जाणार आहे. त्या छायाचित्रांच्या माध्यमातून मंगळावर जीवसृष्टी आहे काय याचा शोध घेतला जाणार आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी ४५० कोटी रुपये खर्च येणार आहे..इस्त्रो जे स्पेसक्राफ्ट तयार करणार आहे ते त्याचं वजन १३५० किलो इतकं असणार आहे.. पीएसएलव्ही एक्सएलच्या माध्यमातून ते मंगळाकडं झेपवणार आहे..या प्रकल्पासाठी १८० वैज्ञानिक दिवसरात्र मेहनत करणार आहेत.

 

मिशन मंगळच्या माध्यमातून भारताच्या अवकाश तंत्रज्ञानातील क्षमतेची कसोटी लागणार आहे. नासाचं मार्स सायन्स लॅब्रोटरी हे मंगळावर उतरणार आहे...पण ते उतरतांना शेवटचे सात मिनिट खूप महत्वाची असणार आहेत...कारण सेंकदाच्या शंभराव्या भागा एव्हडी जरी चूक झाली तरी अनेक वर्षांची मेहनत वाया जाणार आहे..विशेष म्हणजे त्या लँडिंगची जबाबदारी अमेरिकेतील भारतीय वंशाच्या एका महिला वैज्ञानिकावर आहे..

 

जगविख्यात आकाश संशोधन संस्था नासाने आपल्या मार्स सायन्स लॅब्रोटरी अर्थात क्युरोसिटी रोवरच्या लॅन्डिंगच्या सात मिनिटांना सेव्हन मिनिट्स ऑफ टेरर असं नाव दिलंय. कारण याच सात मिनिटात त्या मिशनचं संपूर्ण भविष्य निश्चित होतं.

 

त्या सात मिनिटांत काय़ होईल हा प्रश्न नासाच्या वैज्ञानिकांना वारंवार सतावतोय...कारण जेव्हा नासाचं रोवर ताशी 21हजार 243 किमीच्या हायपरसोनिक वेगाने मंगळ ग्रहाच्या वायुमंडळात प्रवेश करीलं तेव्हा सेकंदाच्या शंभराव्या भागा इतक्या वेळासाठी जरी काही चूक झाली तरी हा कोट्यवधी रुपये किंमतीचा प्रोजेक्ट एक क्षणात नष्ट होवू शकतो..मंगळावर उतरतांना सुरुवातीच्या काळात हीट शिल्डचं मोठं आव्हान असतं..कारण अवघ्या सात मिनिटांत ताशी 13 हजार किलोमीटर वेगाला शून्यावर आणावं लागतं..तसेच रोवरचं वजनही अधिक असल्यामुळं नासाच्या वैज्ञानिकांची चिंता वाढली आहे..कारण नासाचं हे मिशन आजवरच्या मिशनपेक्षा फार मोठं आहे.

 

 

भारतीय कन्येनं स्विकारलंय मंगळाचं आव्हान

 

First Published: Friday, August 3, 2012 - 23:02
comments powered by Disqus