असुरक्षित ज्येष्ठ नागरिक, unsafe Senior Citizens

माणुसकीला काळीमा... ६२ वर्षीय वृद्धेवर बलात्कार

माणुसकीला काळीमा... ६२ वर्षीय वृद्धेवर बलात्कार
www.24taas.com, मुंबई

दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिक गुन्हेगारांचं सावज बनत चालले आहेत..माणुसकीला काळीमा फासणारी घटना नुकतेच मुंबई घडलीय..एका आरोपीने ६२ वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार केलाय...

मुंबईच्या पवई परिसरातल्या याच इमारतीत शनिवारी दुपारी ती भयंकर घटना घडलीय...इमारतीत राहणा-या ६२ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात एक व्यक्ती शिरली.. त्या सैतानाने त्या वृद्ध महिलेवर अत्याचार केला ...आरोपीने केलेल्या अत्याचारामुळे त्या महिलेची अवस्था गंभीर झाली होती त्यामुळे तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं..पोलिसांनी या प्रकरणी बोरीवलीतून एका चाळीस वर्षीय व्यक्तीला अटक केलीय...या प्रकरणातला आरोपी हा पीडित महिलेच्या परिचयाचा असल्याचं पोलिसांनी सांगितलंय..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला घटस्फोटीत असून घटनेच्या वेळी ती घरी एकटीच होती..पीडित महिलेला दोन मुलं असून एक मुलगा बाहेरगावी नोकरीला आहे..आरोपी हा पीडित महिलेच्या परिचयाचा असल्यामुळे महिलेनं दरवाजा उघडला होता..मात्र आरोपीने ओळखीचा गैरफादा घेत असहाय्य वृद्ध महिलेवर अत्याचार केला..या घटनेमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय..

First Published: Monday, December 10, 2012, 23:57


comments powered by Disqus