आदर्श प्रकरणी अखेर कारवाई

Last Updated: Wednesday, March 21, 2012 - 23:57

www.24taas.com, मुंबई 

 

आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी सीबीआयने कालपासून अटक सत्र सुरु केलंय...या प्रकरणात राजकारणी सैन्यदल तसेच राज्य सरकारी सेवेतील माजी अधिका-यांचा समावेश आहे..खरं तर गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपींना अटक करण्याची तसदी सीबीआयने घेतली नव्हती...मात्र कोर्टाच्या फटका-यानंतर सीबीआयने ही कारवाई केलीय.

 

निवृत्त ब्रिगेडियर एम.एम.वांच्छू अध्यक्ष,आदर्श सहकारी गृहनिर्माण सोसायटी, आर.सी.ठाकूर संरक्षण विभागाचे तत्कालीन अधिकारी  सचिव,आदर्श सहकारी गृहनिर्माण सोसायटी माजी प्रधान सचिव,नगरविकास विभाग पी.व्ही.देशमुख, माजी जिल्हाधिकारी प्रदीप व्यास आणि माजी मेजर जनरल टी.के. कौल एकेकाळी केंद्र आणि राज्य सरकारच्या सेवेत अत्यंत महत्वाच्या पदावर कार्यरत असलेल्या या माजी अधिका-यांवर सीबीआयकडून अखेर करावाईचा बडगा उगारण्यात आलाय.. मुंबईच्या कुलाब्यातील वादग्रस्त आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी या आरोपांना अटक करण्यात आलीय.. तसेच  कन्हैयालाल गिडवानी यांच्यावरही तुरुंगाची वारी करण्याची वेळ ओढावली.

 

आदर्श घोटाळ्यात अटकसत्राला सुरुवात झालीय...ब्रिगेडियर एम.एम.वांच्छू  हे आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणातील मुख्य आऱोपी आहे.. आदर्श सोसायटीच्या जमिनीच्या आरक्षणाची माहिती लष्करापासून लपविल्याचा वांच्छू यांच्यावर आरोप आहे... आर.सी . ठाकूर यांनीही य़ा घोटाळ्यात महत्वाची भूमीका बजावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे..ठाकूर  संरक्षण विभागाचे  वसाहत अधिकारी असतांना त्यांनी आदर्श सोसायटीच्या गैरव्यवहाराकडं सोयीस्करुपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे...आदर्श सोसायटीला पर्यावरण खात्याची परवानगी मिळवून दिल्याचा पी.व्ही देशमुख यांच्यावर आरोप आहे...य़ा अधिका-यांप्रमाणेच राजकारणात वजन असलेले कन्हैयालाल गिडवानी यांनीही या घोटाळ्यासाठी राजकीय मदत मिळवून दिल्याचा  आरोप आहे.

 

लष्कराच्या ताब्यातली जमिनी लाटून त्या जागेवर 31 मजली भव्य इमारत उभी करण्याचा कारनामा या आरोपींनी केला आहे...ही इमारत उभी करतांना सगळ्या नियमांची पायमल्ली करण्यात आल्याचा आरोप सीबीआयने केला आहे...हे प्रकरण गंभीर असतांनाही या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर  तब्बल 14 महिन्यांनी  सीबीआयने ही कारवाई केलीय.. आदर्श घोटाळ्या प्रकरणी पहिल्यांदाच आरोपींना अटक केलीय...खरं तर उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर सीबीआयने ही कारवाई करणं भाग पडलंय...पण या कारवाई सत्रामुळे आदर्श घोटाळ्यातील इतर आरोपींचं धाब दणाणलं आहे..

 

आदर्श प्रकरणी गुन्हा दाखल होवूनही कारवाई केली जात नव्हती...तसेच कोणाला अटकही करण्यात आली नव्हती... सीबीआयच्या या मंदगतीच्या तपासावर कोर्टाने गेल्या सुनावणीच्यावेळी कठोर शब्दात ताशेरे ओढले होते...त्या ताशे-यांमुळेच या प्रकरणाच्या कारवाईला गती मिळालीय.

 

'आरोपींविरुद्ध प्रथमदर्शनी पुरावे  आहेत आणि त्यांना अटक करणे गरजेचे आहे, तर ती व्यक्ती कोण आहे हे न पहाता त्यांच्यावर ठोस कारवाई करा' अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये आरोपींवरील अटक कारवाईत विलंब केला गेला तर ते धोकादायक ठरु शकते' 'गुन्हेगार कोणीही असो, त्याच्यावर कारवाई होणारच असा संदेश बड्या राजकीय नेत्यांवरही कारवाई करुन सीबीआयने द्यावा'

 

'आरोपपत्र दाखल करेपर्यंत आरोपीला अटक करु नये अथवा त्याची चौकशी करु नये असे कुठल्या कायद्यात लिहिले आहे '

अशा कठोर शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला गेल्या सुनावणीच्यावेळी फटकारलं होतं...उच्च न्यायालयाचा हा रुद्र आवतार पाहिल्यानंतर  सीबीआयला जाग आली आणि त्यांनी  आदर्शप्रकरणी अटकसत्र सुरु केलं...

 

या प्रकरणी निवृत्त ब्रिगेडियर एम.एम.वांच्छू, संरक्षण विभागाचे तत्कालीन अधिकारी आर.सी.ठाकूर....नगरविकास विभागचे माजी प्रधान सचिव पी.व्ही.देशमुख आणि कन्हैयालाल गिडवानी यांना सीबीआयने गजाआड केलंय...पण या प्रकरणी गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात  गुन्हा दाखल करण्यात आला होता..गुन्हा दाखल होवून एव्हडा कालावधी लोटल्यानंFirst Published: Wednesday, March 21, 2012 - 23:57


comments powered by Disqus