इगतपुरीतील फार्म हाऊसचं रहस्य...

Last Updated: Thursday, July 26, 2012 - 17:45

www.24taas.com, मुंबई

 

इगतपुरीचं फार्म हाऊस आणि लैला खानचे  कसे झाले हत्याकांड.  लैलाच्या हत्याकांडाचे केवळ सर्च ऑपरेशन आणि परवेझनं हत्याकांड केलं या पेक्षाही या सा-या कहाणीमध्ये आणखीनं एक साक्षीदार आहे, स्वताहा अबोल राहूनही खूप काही बोलणारं अर्थातच इगतपुरीचं फार्म हाऊस.. ज्या फार्म हाऊसमध्ये हे सारं हत्याकाडं घडल.. त्य़ा फार्म हाऊसच्या नजरेतून पाहिलं की दिसतात ती आणखीन काही रहस्य.. यावरच थेट घेतलेला वेध, फार्म हाऊसचं रहस्य.

 

सिने अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबियांच्या हत्येचा उलगडा करण्यात अखेर क्राईम ब्रांचला यश मिळालय. या प्रकरणी काश्मीरमधून ताब्यात घेतलेला परवेझ टाक यानंच साथीदाराच्या मदतीनं इगतपुरीत हे हत्याकांड घडवल्याची कबुली दिलीय. इगतपुरीत सहा मानवी सांगाडेही पोलिसांनी जप्त केले असून, यात पाच महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.  गेल्या वर्षभरापासून बेपत्ता असलेल्या अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबियांची हत्या झाल्याचं आता स्पष्ट झालय. लैलाची आई सलिना पटेल हिचा तिसरा नवरा परवेझ टाक यानचं हे हत्याकांड घडवून आणल्याचं पोलीस तपासात उघड झालय

 

आवारातच गाडून टाकले, कसं घडलं हत्याकांड ?
2 फेब्रुवारी 2011 रोजी लैला कुटुंबीयांसह इगतपुरीच्या फार्म हाऊसवर गेली होती.. यावेळी आरोपी परवेझही त्यांच्यासोबत होता.. सलिनाचा दुसरा नवरा असीफ शेख याच्याशी असलेल्या संबंधांवरुन यावेळी परवेझ आणि सलिना यांच्यात भांडण झालं.. त्यानंतर लोखंडी रॉडने परवेझनं सलिनाला मारलं.. त्यात तिचा मृत्यू झाला.. ही मारहाण लैला आणि कुटुंबीयांनी पाहिली.. त्यानंतर परवेझनं लोखंडी रॉडने सगळ्यांचीच हत्या केली..यानंतर फार्म हाऊसवर असलेला काश्मिरी नोकर शाकीर हुसैन याच्या मदतीनं त्यानं हे मृतदेह फार्म हाऊसच्या आवारात गाडले..

 

 

त्यानंतर परवेझ ओशिव-याच्या लैलाच्या फ्लॅटमध्ये आला.. त्या ठिकाणाहून त्यानं मौल्यवान वस्तू ताब्यात घेतल्या..त्यानंतर तो पुन्हा इगतपुरीला गेला.. या ठिकाणी डिझेल जनरेटरमधील डिझेलचा वापर करुन त्यानं बंगला जाळून टाकला.. त्यानंतर त्यानं घोटी परिसरातून काश्मीरला जाण्यासाठी दोन ड्रायव्हरची व्यवस्था केली.. आणि तो लैलाची गाडी घेऊन त्याने काश्मीरला पळ काढला..

 

लैलाच्या याच गाडीनं परवेझ काश्मीरमध्ये अडचणीत आला.. परवेझकडे एवढी चांगली गाडी आली कुठून असा प्रश्न उपस्थित झाला.. आणि अखेर त्याला किश्तवाडमधून पोलिसांनी अटक केली...आणि या हत्याकांडाचा उलगडा झाला..लैलाचं लग्न झालेलं होतं आणि तिचा नवरा तिला घेऊन दुबईला स्थायीक होण्याच्या विचारात होता, अशी माहितीही पोलिसांनी यावेळी दिलीय..

 

 

परवेझ टाकच्या कबुली जबाबानंतर बॉलीवुड अभिनेत्री लैला खानच्या खुनाच रहस्य उलगडत गेल.. जम्मू कश्मीर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या परवेझनं मुंबई क्राईम ब्रांचसमोर इगतपुरीतल्या हत्याकांडाची माहीती दिली.. आणि त्यानंतर सुरु झाला लैला खानसह सहा जणांच्या हत्याकांडाचा शोधतपास.. मुंबई क्राईम ब्रांचच्या सर्च ऑपरेशनच्या प्रत्येक टप्प्यावर झी २४ तासची टिम त्या ठिकाणी हजर होती.. तीही अर्थात एक पाऊल पुढे..

गेल्या काही दिवसापासून एक रहस्य बनलेल्या बॉलीवुड अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटूंबियाचे मृत्युचे रहस्य आता

First Published: Thursday, July 26, 2012 - 17:45
comments powered by Disqus