ऍथलिट सनी पाटीलला मदतीचा हात

Last Updated: Friday, November 18, 2011 - 08:21

झी २४ तास वेब टीम, उरण

 

उरणच्या ऍथलिट सनी पाटीलची संघर्ष कथा झी चोवीस तासानं सर्वप्रथम जगासमोर आणली. झी चोवीस तासनं दाखवलेल्या वृत्तानंतर या होतकरू ऍथलिट्च्या मदतीसाठी हात पुढे सरसावले आहेत. मनसे आमदार राम कदम यांनी ट्रस्टच्या माध्यामातून सन्नीला ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. तर बदलापूरच्या युवराज प्रतिष्टानचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनीही सनीला २१ हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. माळरानावर सराव करणाऱ्या सनीनं मुंबई विद्यापिठाच्या ४०० मीटर शर्यतीत विक्रमी कामगिरी केली.

 

वडील रिक्षाचालक आणि घरची बेताची परिस्थितीतही सन्नीने अनेक स्पर्धेत मेहनतीच्या जोरावर यश मिळवलं. महाराष्ट्राकरताही त्यानं अनेक मेडल्स पटकावले. त्याच्या याच कामगिरीचा वेध झी २४ तासनं घेतला.सन्नी पाटील या उरणच्या ऍथलिट्ची संघर्ष कथा झी 24 तासानं सर्वप्रथम जगासमोर आणली आणि या उपेक्षित क्रीडापटूला मदत करण्यासाठी हात पुढे सरसावले. घरची बेताची परिस्थिती. आणि अनेक अडचणीही या रिक्षाचालकाच्या मुलाची वाट रोखू शकले नाहीत.

 

माळरानावरून धावून सन्नीनं मुंबई विद्यापीठाच्या स्पर्धेत केलेला विक्रम अनेकांच्या मनाचा वेध घेणारा ठरला. आणि झी चोवीस तासच्या वृत्तानंतर सन्नीला मदतीचा ओघ सुरु झाला. सन्नीच्या आत्तापर्यंतच्या कामगिरीला अनेकांनी सलामही ठोकला आहे. तर अनेक हात सन्नीच्या संघर्षाला मदतीचे बळ देण्यासाठी पुढे आले. कोणत्य़ाही सुविधा नसताना सन्नीनं मिळवलेलं यश कौतुकास्पद आहेच. ऑलिंपिक गाठण्याच्या ध्येयानं पछाडलेल्या या खेळाडूंच्या स्वप्नाला आता अनेकांची मदत बळ देणारी ठरेल हे नक्की.

 First Published: Friday, November 18, 2011 - 08:21


comments powered by Disqus