चंद्र कुणाचा ?

चीननं अतराळावर कब्जा करण्याची मोहीम आता सुरु केलीय.. आता चीननं एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतलाय.. आणि यावेळी चीनला गाठायचंय आणि आपल्या कवेत ठेवायचयं ते अंतराळ.

Updated: Jun 29, 2012, 12:09 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

चंद्रावर कुणाचा झेंडा ?

चीन-अमेरिका आमने-सामने !

आता सुरु होणार अंतराळ युद्ध ?

 

चंद्र कुणाचा ?

 

चीननं अतराळावर कब्जा करण्याची मोहीम आता सुरु केलीय.. आता चीननं एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतलाय.. आणि यावेळी चीनला गाठायचंय  आणि आपल्या कवेत ठेवायचयं ते अंतराळ. चीन भारताच्या सिमेलगत असणारं शेजारी राष्ट्र.. पण या चीननं गेल्या काही दिवसात छुपी सैन्यमोहीम चालवलीय त्याचं पुढचं पाऊल म्हणजे ही दृष्य़. कुठल्या तरी वैज्ञानिक अंतराळ मोहीमेची ही चाचपणी असले असा जर तुमचा समज असेल तर तो केवळ गैरसमज ठरेल. कारण ही  दृष्य़ आहेत जी चीनची अंतराळवर कब्जा करण्यासाठी चालवलेल्या मोहीमेच्या.. अवघ्या दहा दिवसावर चीनची आतापर्यंतची सर्वात मोठी मोहीम आलीय.. आणि याबाबत चीननं प्रचंड गोपनीयता पाळलीय. मोहीमेचा हेतू हा अंतराळ अभ्यास असा जगासमोर असला तरी या मोहीमेचा अंतस्थ हेतू काही वेगळाच आहे अशी शंका संरक्षण तज्ञानी व्यक्त केलाय.. तीन अंतराळवीराना घेऊन अंतरिक्षात नवनवे प्रयोग करणार असल्याचा दावा चीनने केलाय.. त्यातून येणारा अभ्यास हा आगामी अंतराळ मोहिमांसाठी अतिशय महत्वाचा ही ठरेल...

 

पण तो पर्यंत अन्य देशांना अंतराळ मोहीमा आखण्याची संधी चीन देईल का ही भिती व्यक्त करण्यात येतेय़.. चीनचा छुप्या मार्गाने शेजारील राष्ट्राच्या सिमारेषेवर घुसखोरी करुन ताबा ठेवण्याचा मनसूबा आता दडून राहिलेला नाही.. पण आता एवढच नाही.. तर चंद्रावरही  जाण्याची तयारी चीनने सुरु केलीय.. चंद्रावर चीनी माणसाचं पाऊल पडण्यापुर्वी त्याच्या अगोदर चीनी बनावटीचा रोबोट चंद्राच्या वातावरणाचा अभ्यास करणार आहे. आणि त्या अभ्यासानंतर चीन चंद्रावर आपलं पहिले पाऊल ठेवणार आहे..

 

चीनचा अंतरीक्ष प्रगती विलक्षण झपाट्यानं सुरु आहे.. पण या सा-यात प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे, चीनला नेमक काय साध्य करायचयं  ? अंतराळ आणि विशेषतः चंद्राबाबत जाणून घ्यायची मानवाची उत्सुकता नवी नाही... आणि याच उत्सुकतेपोठी अनेक देशांनी अंतराळ मोहिमा राबवल्या.. या मोहिमेतंर्गत जी काही रहस्य उलगडली त्याचा मानव जातीच्या भल्यासाठीच उपयोग करण्यात आला.. आता चीननेही अशीच एक मोहीम सुरू केलीय.. मात्र त्या मोहीमेचं फलित मानव जातीच्या कल्याणासाठी होणार की विध्वंसासाठी हे काळचं ठरवेल. पृथ्वीवर अंतरिक्ष यान लॉंच होण्यात आणि मिसाईल लॉंच होण्यात तसा जास्त फरक नसतो..

 

पण अंतरिक्षयानातून  अग्नीज्वाळा फेकत मनुष्याचे जिवन सुखी आणि समृद्धी करण्यासाठी  नवनवीन तंत्रज्ञान  समोर येतं. आणि मिसाईल लॉंच झाल्यावर एखाद्या सुखी समृद्धी मनुष्यवस्ती अग्निज्वाळानं वेढत राख होऊ शकते.. हा फरक आहे, तो तंत्रज्ञानातील नाही तर तंत्रज्ञानाच्या स्वार्थी वापराचा.. आणि म्हणूनच प्रश्न विचारला जातोय, तो चीनच्या स्पेस स्टेशनमुळे नेमकं काय साधलं जाणारं आहे.. चंद्रावर मानवी सृष्टी वसवण्यासाठी  नवे तंत्रज्ञान शोधलं जाईल का ? कि असलेली मानवी सृष्टी शत्रू म्हणून तिच्यावर वचक ठेवण्यासाठी विध्वंसक कारवाईला बळकटी दिली जाईल. सैन्य अभ्यासकच नव्हे तर चीनच्या रण नितीचा अभ्यास करणारे सर्वचजण चीनच्या दुहेरी हेतूमुळे या मोहीमेबद्दल संशय व्यक्त करतायत.. स्पेस स्टेशनवर अब्जावधी रुपयांचा खर्च करण्यामागे चीनचा नेमका हेतू काय हा सवाल थेट विचारला जातोय.. कारण भारतीय सिमारेषेबद्दल आणी सुरक्षा यंत्रणावर चाल करुन येण्यात चीनची भुमिका नेहमीच संशयास्पद राहीलीय. गेल्या कित्येक वर्षापासून  चीन सीमा विवाद सोडवण्यापेक्षा खतपाणी घालतेय. आणि भारताच्या लाईन ऑफ कंट्रोलवर आपली म