झी २४ तास 'अनन्य सन्मान' लवकरच....

Last Updated: Thursday, March 1, 2012 - 12:47

www.24taas.com, मुंबई

 

प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहून विविध क्षेत्रांमध्ये मोलाची कामगिरी बजावणाऱ्या कर्मविरांना 'झी २४ तास'तर्फे दरवर्षी 'अनन्य सन्मान' प्रदान करुन गौरवण्यात येते. येत्या २ मार्चला मुंबईत एका दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत २०११ साठीचे अनन्य सन्मान प्रदान करण्यात येणार आहेत.

 

या गौरव सोहळ्याचे हे चौथं वर्ष आहे.अनन्य सन्मानच्या पहिल्या वर्षाची सुरवात ही २००९ साली सुरू झाली होती. त्यानंतर सतत हे चौथं वर्ष या सन्मान सोहळ्याचं आहे.

 

समाजासाठी नेहमीच्य झटणाऱ्या असामान्य व्यक्तींचा गौरव झी नेहमीच करीत असतं. आणि यासाठीच या सोहळ्याचे आयोजन केले जाते. झी २४ तास यावर्षीही अशाच काही असामान्य व्यक्तींचा सन्मान करणार आहे. त्यामुळे समाजासाठी काहीतरी करण्याच्या त्यांच्या याच भावनेला झी २४ तासचा हा खास अनन्य सन्मान.

 

 

 First Published: Thursday, March 1, 2012 - 12:47


comments powered by Disqus