डॉक्टर यमदूत

बेकायदा गर्भपात आणि गर्भलिंगनिदान प्रकरणात तब्बल 26 दिवस फरार असलेला परळीतला डॉ मुंडे दांपत्य अखेर पोलिसांना शरण आलं. आणि प्रश्न निर्माण झाला तो तब्बल सव्वीस दिवस हे दाम्पत्य कुठे दडून राहील होतं..

Updated: Jun 18, 2012, 11:57 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

बेकायदा गर्भपात आणि गर्भलिंगनिदान प्रकरणात तब्बल 26 दिवस फरार असलेला परळीतला डॉ मुंडे दांपत्य अखेर पोलिसांना शरण आलं. आणि प्रश्न निर्माण झाला तो तब्बल सव्वीस दिवस हे दाम्पत्य कुठे दडून राहील होतं.. आणि कोण होत यांचे आश्रयदाते.. मुडे दाम्पत्याच्या सव्वीस दिवसांच्या दाहीदिशा भ्रमंतीची ही कहाणी

 

23 मे 2012 ते 17 जून 2012 असे 26 दिवस डॉ. मुंडे फरार होता. त्यानं भाड्यानं घेतलेल्या बोलेरो गाडीचा ड्रायव्हर परमेश्वर अंकुशे आणि अष्टविनायक मेडिकलचा चालक संजय सोनी त्याच्यासोबत होते. बीड क्राईम ब्रांच, मुंबई क्राईम ब्रांच आणि पुणे क्राईम ब्रांचच्या पाच टीम डॉ. मुंडे दांपत्याला महाराष्ट्रात आणि शेजारच्या राज्यात शोधत होत्या. तरीही मुंडे सापडला नाही. अत्यंत चतुराईनं आणि तांत्रिक पद्धतीचा योग्य वापर करत त्यानं पोलिसांना गुंगारा दिला. मोबाईल नंबर आणि सीम कार्डवरुन पोलिसांच्या हाती लागू नये यासाठी डॉ. मुंडेंनं 26 दिवसांच्या प्रवासात तब्बल 17 मोबाईल्स आणि 70 सीमकार्ड्स बदलले.

 

23 मे 2012 रोजी डॉ. मुंडे दांपत्य परळीतून फरार झाले. 24 मे रोजी त्यांनी हैदरदाबादमध्ये डॉक्टर असलेल्या मित्राकडं मुक्काम केला. तिथून तिरुपतीकडे जातो असं सांगून तो विजयवाड्यातून पुन्हा महाराष्ट्रात परतला, महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात शिवपुरीमध्ये गेला. तिथून राज्यस्थानमधल्या जयपूर आणि उदयपूरमध्ये गेला, तिथून उत्तर प्रदेशात कानपूरमध्ये, त्यानंतर पुन्हा मध्यप्रदेशातल्या कटनीमध्ये, तिथून छत्तीसगडमधल्या बिलासपूरमध्ये आणि झारखंडमध्येही त्यानं काही प्रवास केला. तिथून अखेर तो महाराष्ट्रात परळी पोलिसांना शरण आला. या प्रवासात त्यानं एका ठिकाणी एक दिवस किंवा फारतर दोन दिवस मुक्काम केला. पोलिसांना तो सापडला नसला तरी पोलिसांची पाळत आणि आर्थिक नाकेबंदी केल्यामुळं 17 जून रोजी परळीत मुंडे पोलिसांना शरण आला.

 

पोलिसांना चुकवण्यासाठी अनेक वेळा मुंडे दांपत्यानं तोंडाला काळे कपडे बांधून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. तसंच मुंडे दांपत्य हॉटेलमध्ये एसी रुपममध्ये राहयचं तर गाडीचा ड्रायव्हर आणि अष्टविनायक मेडिकलाचा चालक संजय सोनी हे बोलेरो गाडीतच झोपायचे. एवढच नाही तर पोलिसांनी आर्थिक नाकेबंदी केल्यामुळं पैशांची चणचण जाणवल्यानंतर मुंडेनं दोन ठिकाणी हॉटेलची बिल न देताच पळ काढला. शरण येण्याच्या आधी 24 तास मुंडे दांपत्य परळी भागात फिरतं होतं. तर पोलिसांची पथकं परराज्यात त्याला शोधत होती. शेवटी चौफेर कोंडी झाल्यानंतर मुंडे पोलिसांना शरण आला.

 

डॉ.सुदाम मुंडेला अटक नाही तर शरणागती नंतर अटक करण्यात पोलिसांना यश मिळालंय..हे वाक्य अतिशय महत्वाचे आहे.. कारण याच वाक्यात अधोरेखित आहे.. अकार्यक्षमता आणि नेत्यांचा छुपा वरदहस्त.परळी पोलिसांना शरण येण्यापूर्वी डॉ. मुंडे दांपत्य 24 तास त्याच परिसरात होतं. त्याचवेळी पोलिसांच्या पाच टीम मुंडेचा परराज्यात शोध घेत होत्या. प्रसिद्धी माध्यमातून या प्रकरणाची एवढी चर्चा होऊनही त्याचा 24 तास परळी भागात पोलिसांना कसा थांगपत्ता लागला नाही असा प्रश्न पडतो. मुंडेला राजकीय आणि पोलिसांचं समर्थन असल्याशिवाय तो पोलिसांना गुंगारा देऊ शकतो का असा प्रश्न पडतो.

 

तब्बल 26 दिवस पोलिसांना डॉ. मुंडे सापडला नाही यावरही विश्वास ठेवणं अवघड आहे. एकतर मुंडेला शोधण्यात पोलीस कमी पडले किंवा त्याला लवकर शोधाण्यात त्यांना रस नव्हता असा सूर माजी पोलिस अधिका-यांकडून येतोय. नुकत्याच झालेल्या केज विधानसभा निवडणुकीतही डॉ. मुंडे कोणत्या पक्षाचा यावरुन चिखलफेक झाली. डॉ. मुंडे याच्याशी आपला काहीही संबंध नसून, ते राष्ट्रवादीचेच असल्याचा आरोप गोपीनाथ मुंडे यांनी केला होता. केवळ आडनावामुळे आपली याप्रकरणात नाहक बदनामी होत असल्याचं सांगत, त्यांनी डॉ. मुंडे याचा मुलगा व्यंकटेशनं राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे फोटो दाखवले. याला उत्तर देत राष्ट्रवादीचे आमदार सुरेश धस यांनी गोपीनाथ मुंडे आणि डॉ