प्रिन्स शिवाजी हॉलवरून धुमश्चक्री

Last Updated: Thursday, July 26, 2012 - 07:31

www.24taas.com, कोल्हापूर

 

कोल्हापूरातील शाहू महाराजांनी आपल्या मुलांच्या स्मरणार्थ बांधलेला प्रिन्स शिवाजी हॉल करवीर नगर वाचन मंदिरातील संचालक मंडळांनी संगनमतानं पाडला आहे. त्यामुळं कोल्हापूरातील शाहूप्रेमी संतापले.

 

त्यांनी एक महिन्यापुर्वी संचालक मंडळाला पाडलेला हॉल जसा आहे तसा बांधण्याबाबत विनंती केली होती.त्याचबरोबर करवीरनगर वाचन मंदिरांच्या मुळं वास्तुला धोका पोहचत आहे,त्यामुळं नवीन इमारतीसाठी खणलेला खड्डा तात्काळ बुजवून घ्यावा असं विनंती केली होती. तरीही संचालक मंडळ हा खड्डा बुजवून घेण्यासाठी टाळाटाळ करत होते. आज या संदर्भात करवीर नगर वाचन मंदिर इथं बैठक झाली.त्यावेळी संचालक मंडळानं समाधानकारक उत्तर न दिल्यानं शाहू प्रेमी संतापले आणि त्यांनी करवीर नगर वाचन मंदिराच्या संचालकांच्या तोडांला शाई फासली.

 

जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: या स्थळाला भेट देवून नवीन इमारत उभारण्यासाठी खणण्यात आलेला खड्डा बुजवून घ्या, असा आदेश दिला होता तरीही संचालक मंडळ याकडं दुर्लक्ष केलं.आज झालेल्या पावसामूळं मूळ इमारतीचा पाया पुन्हा ढासळला.

 

[jwplayer mediaid="145648"]

First Published: Thursday, July 26, 2012 - 07:31
comments powered by Disqus