बाळासाहेबांची प्रकृती स्थिर

Last Updated: Thursday, July 26, 2012 - 19:33

www.24taas.com, मुंबई

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती स्थिर आहे. आज ते प्रसन्न मूडमध्ये होते. सकाळी त्यांनी पेपर वाचनही केलं.

 

प्रकृती अस्वास्थ्यामुळे बाळासाहेबांना मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. बाळासाहेबांची प्रकृती स्थिर असून काही चाचण्यांसाठी त्यांना आणखी दोन-तीन दिवस हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात येणार आहे.

 

भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आज सकाळी बाळासाहेबांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. विनोद तावडे, आमदार दीपक सावंत, चित्रपट निर्माते मधुर भांडारकर यांनीही बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल लीलावतीमध्ये जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली. सुमारे अर्धा तास ते बाळासाहेबांसोबत होते.

First Published: Thursday, July 26, 2012 - 19:33
comments powered by Disqus