बेलगाम ‘डॉन’

बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान पुन्हा एकदा वादात अडकला आहे. वानखेडे स्टेडियमवर गोंधळ घातल्याचा तसेच धमकावल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. तर आपण निर्दोष असल्याचा दावा शाहरुखने केलाय

Updated: May 17, 2012, 09:18 PM IST

www.24taas.com, मुंबई

बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान पुन्हा एकदा वादात अडकला आहे. वानखेडे स्टेडियमवर गोंधळ घातल्याचा तसेच धमकावल्याचा आरोप ठेवण्यात आलाय.  तर आपण निर्दोष असल्याचा दावा शाहरुखने केलाय. नेमकं काय घडलं होतं वानखेडे स्टेडियमवर? कुणी उकरुन काढला होता वाद ? चूक कोणाची ?शाहरुखची की स्टेडियमवरच्य़ा कर्मचा-यांची ? पुढं काय होणार या वादाचं ?

 

मुंबईच्या वानखेडेवर गोंधळ घातल्य़ाचा किंग खानवर आरोप आहे...शाहरुखने मैदानात शिरण्याचा प्रयत्न केला ..पण स्टेडियमवरच्या सिक्युरिटी गार्डसनं रोखल्यानंतर त्यानं अर्वाच्य भाषा तर वापरलीच शिवाय धक्काबुक्की केली. या सगळ्याप्रकरणामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशननं त्याच्याविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार नोंदवलीय...

 

शाहरुखनं रिअल लाईफमध्येही असाचं धिंगाणा घातलाय... मुंबई इंडियन्सवर केकेआरने मात केल्यानंतर वानखेडे स्टेडियमवर देवदास शाहरुखनं हा धिंगाणा घातला.. झिंगलेल्या किंग खानने सिक्युरिटी गार्डला शिवीगाळ आणि मारहाण तर केलीच, मात्र एमसीए आणि बीसीसीआयच्या अधिका-यांनाही धमक्या दिल्या...

 

बाजीगरच्या या फुल टू फिल्मी स्टाईल ड्राम्यामुळं वैतागलेल्या MCA नं अखेर मरिन लाईन्स पोलीस स्टेशनात शाहरुखविरोधात तक्रार नोंदवलीये...

 

स्लिव्हर स्क्रिनचा हा बादशहा आजवर पब आणि पार्ट्यांमध्ये दारू पिऊन धिंगाणा घालण्यात मशहूर होता... आता मात्र, थेट क्रिकेटच्या मैदानावरही त्यानं आपली इनिंग कंटिन्यू केल्यानं फिल्मी आणि क्रिकेट कल्चर एकत्र आणणा-या आयपीएलच्या बदनामीतही भरच पडलीये...

 

वाद आणि शाहरुख खान हे जणू समिकरणचं बनलंय वानखेडेच्या घटनेपूर्वीही तो अनेक वेळा वादा सापडला होता...त्या घटनांवरही आता एक नजर टाकूया...

बॉक्स ऑफिसवर सिनेमांना सतत येत असलेलं अपयश आणि ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकटमध्ये टीमला मिळालेलं यश या दोघांचा शाहरुख खानवर असा काही परिणाम होईल याचा कोणी विचारही केला नसेल...दारुच्या नशेत गोंधळ घातल्याचा आऱोप बॉलीवूडच्या बादशाहवर लावण्यात आलाय..आयपीएलमधील एका क्रिकेट टीमचा मालक असल्याची गुर्मी आणि फिल्मस्टारच्या तो-यात शाहरुख खानने बुधवारी रात्री मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर गोंधळ घातला...पण शाहरुख खानने अशा प्रकारे वर्तन करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही...

 

 

यापूर्वीही बॉलीवूडचा डॉन जयपूरच्या मानसिंग स्टेडियमवर एका क्रिकेट सामान्या दरम्य़ान सिगरेट पितांना आढळून आला होता..खरं तर सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास बंदी असल्याची सर्वांनाच कल्पना आहे..पण असं असतांनाही क्रिकेट सामन्या दरम्यान शाहरुख खान सिगरेट पितांना हजारो प्रेक्षकांनी बघीतलं..राष्ट्रीय चॅनलवरुन देशभर त्या सामान्याचं प्रक्षेपण केलं जात होतं आणि शाहरुख खान बिनधास्तपणे सिगरेटचा धूर हवेत सोडत होता..राजस्थान मध्ये 2000साला पासून सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे..पण शाहरुख खानला कायदाची जराही भीती वाटली नाही...या प्रकरणी शाहरुख खानला समन्स बजावण्यात आलं असून 26 मे रोजी त्याला कोर्टात हजर रहावं लागणार आहे....

 

कोलकात्तामध्ये नुकतेच झालेल्या मॅच दरम्यानही शाहरुख खानने ईडन गार्डन स्टेडियमवर गोंधळ घातला होता..स्टेडियमवर फ्रेंडली मॅच करण्याचा शाहरुख खानचा इरादा होता...पण तिथ दोन दिवसानंतर मॅच होणार होती त्यामुळे स्टेडयमच्या व्यवस्थापकांनी शाहरुखचा आग्रग धुडकावून लावला आणि त्यामुळेच शाहरुखने गोंधळ घातला होता...

 

शाहरुखने केवळ क्रिकेट स्टेडियमवरचं गोंधळ घातलाय असं नाही तर बॉलीवूडच्या पार्ट्यांमध्येही त्