मंकी मॅनची दहशत

मुंबई आणि परिसरात पसरलीय मंकी मॅनची दहशत,मुंबईच्या वेशीबाहेरच्या उपनगरातून वाड्या-वस्त्यावस्त्यांच्या छपरांवरून मंकी मॅनची ही दहशत आता थेट उच्चभ्रुंच्या सोसायट्यात पसरलीय.एकीकडे पोलीस जीव तोडून सांगतायेत की ही अफवा आहे मात्र शांतता भेदत जाणा-या किंकाळी प्रमाणे ही अफवा वेगाने पसरतेय.

Updated: Mar 1, 2012, 11:33 PM IST

www.24taas.com, मुंबई 

 

मुंबई आणि परिसरात पसरलीय मंकी मॅनची दहशत,मुंबईच्या वेशीबाहेरच्या उपनगरातून वाड्या-वस्त्यावस्त्यांच्या छपरांवरून मंकी मॅनची ही दहशत आता थेट उच्चभ्रुंच्या सोसायट्यात पसरलीय.एकीकडे पोलीस जीव तोडून सांगतायेत की ही अफवा आहे मात्र शांतता भेदत जाणा-या किंकाळी प्रमाणे ही अफवा वेगाने पसरतेय. 

 

होय.. उपनगरासह मुंबईवर सध्या एकं नव्या संकट त्यांच्या छपरावरुन, झाडांवरुन घोंघावतय.. कुणी म्हणतय तो मंकीमॅन आहे, कुणी म्हणतात ती नरभक्षक आदिवासी टोळी आहे. कुणी म्हणतात ती चड्डी बनियान टोळी आहे.. गजबजलेल्या मुंबापुरीला रात्र रात्र जागवणारं मुंबईच्या वेशीबाहेरचं संकट आता मुंबईत येवून धडकलय... गेले दोन महिने भांडुप - ठाण्यामधले रात्र रात्र जागतायत, आता तिच वेळ मुंबईकरांवर आलीय.. पण हे नेमंक का घडलं.. य़ा अफवा एवढ्य़ा विलक्षण वेगानं फिरतायत कि वा-याचा वेगही थिटा पडावा.. बाता सा-याच करतायत..

 

पण प्रत्यक्षात मात्र कुणीही मंकीमॅनला पाहिलं नाही की कुणालाचं अंगाला ग्रीस लावून मुल पळवणारी टोळी दिसली नाही.. अवघ्या मुंबईभर पसरलेल्या सिसीटिव्हीच्या फुटेजमध्ये तरी किमान त्या संशयिताची दृष्य का दिसत नाही एवढाही विचार तर्काच्या पातळीवर कुणी का करत नाही.. पण एक मात्र नक्की कालपर्यंत झोपड्याच्या पत्र्यावर ऐकू येणा-या आवाजांच्या अफवा उच्चभ्रुच्या अपार्टमेंटमध्ये आल्यावर आता याची तीव्रता जास्त झालीय..

तरीपण एक प्रश्न अजुनही कायम राहतोच..

 नेमंक काय आहे यामागंच सत्य ?

 

 

तो आक्राळ  विक्राळ आहे.काळाकभिन्न आहे तो रक्तपिपासू आहे,तो कैक फुटांवरून उडी मारी शकतो, तो हातात सापडूच शकत नाही, ...ते अंगाला ग्रिस लावून येतात ते आदिवासी आहेत, लहान मुलांच्या किडन्या काडून फस्त करतात,अशी रसभरित वर्णन मंकी मँन आणि चोरांच्या बाबतीत रंगवुन रंगवुन सांगितली जातायेत. या अशा अफवाना वेळीच लगाम घालण्याची जबाबदारी आता आपणा सर्वांवर आलीय 

 

गेले महिनाभर कथित मंकी मॅननं मुंबईकरांची झोप उडवलीय.... भांडुपमधून सुरु झालेल्या अफवा मग वा-यासारख्या मरोळ, गोरेगाव, कांदिवली अशा मुंबईभर पसरल्या आणि नागरिकांमध्ये दहशत वाढली..... मंकी मॅन आहे कसा, तो कसा हल्ला करतो याबाबत नागरिकांत वेगवेगळी चर्चा आहे.... त्याला पाहिल्याचा दावा करणारा कुणी पुढे येत नाही.... पण कुणाकडून आलेल्या माहितीवरून मंकी मॅनचं वर्णन मात्र रंगवून सांगितलं जातं.... त्यामुळे परिसरात दहशत वाढते आणि लोक दिवसरात्र डोळ्यात तेल घालून पहारा देतात..... चोरीचे प्रकार वाढल्यानंतर झोपड्यांवरून उड्या मारून जाणारे चोर कुणीतरी पाहिले आणि त्यातूनच मंकी मॅनच्या अफवांचा बाजार सुरु झाला.

 

पुढे या अफवांनी मुंबईकरांनी इतकी धडकी भरवली की सध्या मुंबईकरांच्या डोक्यावरून मंकी मॅनचं भूत उतरायला तयार नाही..

कांदिवलीत या अफवेमुळे तरुणांना जीव गमवावा लागला.... मंकी मॅनला शोधण्यासाठी घराबाहेर गेलेला तरुण पाय घसरून पडला आणि त्याचा हकनाक बळी गेला.... मंकी मॅन म्हणजे निव्वळ अफवा असल्याचं पोलिसांनी कितीही सांगितलं तरी सगळीकडे सुरु असलेली चर्चा आणि मोबाईलवरून येणारे एसएमएस यामुळे मंकी मॅनची दहशत रोज वाढतेच आहे.... जागरण करून पहारा देणारे लोक कधी कधी संशय आला तर एखाद्या व्यक्तीला बेदम मारहाण करतात.... अशा अनेक घटना महिनाभरात घडल्यात.... केवळ अफवांनी धास्तावलेल्या नागरिकांना पोलिस दिलासा देऊ शकलेले नाहीत..... त्यामुळे आता या अफवा पसरवणा-यांनाच पायबंद घालण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.... मुंबईकरांनीही अफवांवर विश्वास न ठेवता चर्चेची शहानिशा करायला हवी.... अन्यथा मंकी मॅनच्या अफवा पसरवणारे बाजूलाच राहतील आणि निष्पाप लोकांचे हकनाक बळी जातील.....

 

सुरुवातीला केवळ भांडुप-ठाण्याची दहशत आता मुंबईभर घोंघावतेय.. ज्या भागात या अफवा आहेत, त्याच भागातून आता नवीन अफवा पसरवली गेली आणि या आदिवासींच्या दहशतीचे आणि बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये राहणा-या आदिवासी बांधवाबद्दल गैरसमज पसरवण्याचं  गैरकृत्य सुरु झालयं.. पण टॉवरर्सच

Tags: