मान्सून ऑडिट

Last Updated: Thursday, June 7, 2012 - 08:39

www.24taas.com, मुंबई  

अखेर मान्सून राज्यात  दाखल झालाय आणि लवकरच तो मुंबईतही धडक देणार आहे. पण मान्सूनचा सामना करण्यासाठी  मुंबई पालिकेनं काय तयारी केलीय? जे दावे पालिका अधिकाऱ्यांकडून करण्यात येतायत, त्यात तथ्य आहे का?  मुंबईत २६ जुलैसारखा पाऊस झाला तर? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेऊयात ‘मान्सून ऑडिट’मधून...

 

 

 

२६ जुलैचा 'तो' दिवस 

पाऊस म्हटलं की पूर्वी हमखास पाहायला मिळत असलेला चाकरमान्यांचा एक अनावर उत्साह आता मावळलाय. उन्हानं जीवाची लाहीलाही झाली तरी खूप पाऊस नको असतो आणि याला कारण आहे. ते म्हणजे २६ जुलैचा प्रलय... २६ जुलै २००५ चा पाऊस मुंबईकर कधीच विसरु शकणार नाही. कारण त्या दिवशी मुंबईवर अस्मानी संकट कोसळलं होतं. अवघी मुंबई जलमय झाली होती. मुंबई-कधीही न थांबणारं शहरंही त्यादिवशी कोलमडून पडलं होतं. सतत धावणारं शहर अशी ओळख असलेल्या मायानगरीला त्या दिवशी ब्रेक लागलं होता. तो क्षण आजही कित्येक मुंबईकरांच्या डोळ्यांसमोर उभा राहतो.

 

 

 

महापालिकेचा दावा

पावसाळा आता उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. या पार्श्वभूमिवर मुंबईत  नालेसफाई तसंच रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याचं कामं पूर्ण झाल्याचा दावा पालिका अधिकाऱ्यांकडून करण्यात आलाय. नालेसफाईचं काम जवळपास  पूर्ण झालंय. मुंबई शहरात ९१ टक्के, पूर्व उपनगरात ९६ टक्के तर पश्चिम उपनगरात ९९ टक्के नालेसफाई पूर्ण झालीय, असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येतंय. मुंबईत मान्सून  दाखल होण्यापूर्वी ही कामे पूर्ण झाली असल्याचं त्यांनी म्हटलंय. पालिकेनं ४ लाख ४० हजार क्युबिक गाळ उपसला असून  मुंबईकराना अतिवृष्टीचा फटका बसू नये यासाठी  २१३ फ्लडिंग स्पॉटवर २३० पाणी उपसणारे पंप बसवल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिलीय. नालेसफाई साठी ७० कोटी रुपये, खड्डे बुजवण्यासाठी ८७ कोटी रुपये तर पाण्याच्या निचऱ्यासाठी १२ कोटी रुपयांची तरतूद महापालिकेनं केलीय. पण, खरंच ही कामं झाली आहेत का? पालिका अधिकारी सांगतायत ती कामं नेमकी झालीत कुठे? असा प्रश्न मुंबईकरांना पडलाय. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मोठमोठे दावे केले असले तरी वास्तव काही वेगळचं आहे. अनेक ठिकाणी कामे अपूर्ण असून त्याचा फटका मुंबईकरांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

 

 सगळंच आलबेल

पाऊस तोंडावर असतानाही मिठी नदीतील गाळ काढण्याचं काम आजही सुरुच आहे. मिलन सब-वे आणि इतर ठिकाणची परिस्थितीही काही वेगळी नाही. सात वर्षापूर्वी  म्हणजेच २६ जुलै २००५ रोजी मुंबईनं पावसाचं रौद्र रुप अनुभवलंय. अर्धी मुंबई जवळपास दोन दिवस पाण्याखाली गेली. कुर्ला, वांद्रे आणि वांद्रे-कुर्ला संकूल या भागात पुराचा सर्वात मोठा फटका बसला. याला एकमेव कारण म्हणजे मिठी नदीची झालेली गळचेपी. एकेकाळी स्वच्छ पाण्याचा प्रवाह असलेली नदी गटार बनलीय. तसेच याही नदीच्या पात्रावर ठिकठिकाणी अतिक्रमण झाली होती, नदीचे पात्र अरुंद झाले होतं. २६ जुलैच्या पावसानंतर नदीच्या विकासासाठी मिठी नदी प्राधिकरण स्वतंत्र स्थापन करण्यात आली. मिठी नदीमधील गाळ उपसणे, नदीचे रुंदीकरण करणे, संरक्षक भिंत घालणे अशा कामांना सुरुवात झाली. यंदाही पाऊसाची चाहूल लागलीय पण, अद्यापही कुर्ल्याच्या क्रांतीनगर परिसरातील  मिठी नदीच्या पात्रात  गाळ उपसण्याचं काम सुरु आहे. गा

First Published: Thursday, June 7, 2012 - 08:39
comments powered by Disqus