मुंबईचा सिंघम?

Last Updated: Thursday, June 14, 2012 - 23:37

www.24taas.com, मुंबई

 

सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांनी मुंबईतील अनेक पब, बार आणि पार्ट्यांवर कारवाई केलीय. त्यांच्या या कारवाईमुळे मुंबईतील पब आणि बार मालकांमध्ये त्यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तसेच रात्रभर पब आणि डिस्कोथेकमध्ये रमणा-या धनदांडग्यांनी ढोबळेंचा पुरता धसका घेतलाय.

 

गुंडांची यथेच्छ धुलाई करणारा सिंघम तुम्ही रुपेरी पडद्यावर बघितला असेल. पण वास्तवातही असाच एक पोलीस अधिकारी मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे. कुठेही छापा मारायला तो अधिकारी मागे पुढे पहात नाही. खबर मिळताच तो आपल्या सहकाऱ्यांसबोत घेऊन धडक कारवाई करतो. त्यामुळे अवैध धंदे करणा-यांनी त्याचा चांगलाच धसका घेतला असून त्याचं नाव आहे.

 

मुंबई पोलीस दलात ढोबळे हे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी डान्सबारपासून ते पब आणि श्रीमंतांच्या आलिशान पार्ट्यांवरही छापा कारवाई केलीय. त्यामुळेच  चोरीछुपे  डन्साबार चालविणा-यांचे धाबे दणाणले असून ढोबळेंच नाव ऐकताच पब आणि डिस्कोथेकमध्ये मदीरेच्या कैफात मस्ती करणा-या धनदांडग्यांची झिंग क्षणात उतरल्याशिवाय राहात नाही. एसीपी ढोबळेंच्या धडाकेबाज कारवाईमुळे मुंबई पोलीस दलात त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे...ढोबळेंची कारवाई करण्याची  खास पद्धत  आहे...पोलीस कारवाईसाठी काठीचा वापर करतात...पण एसीपी ढोबळे कारवाईसाठी हॉकी स्टीकचा वापरतात...एखाद्या ठिकाणी  कारवाई केल्यानंतर ते तिथ असलेल्या सर्वांना थेट पोलीस स्टेशन दाखवतात....कुणाचाही निरोप आला तरी ते मागे हाटत नाहीत...आणि त्यांची कारवाई थांबत नाही...

 

डान्सबार, हुक्का पार्लर आणि पबवाल्यांनी जसा ढोबळेंचा धसका घेतलाय तसचं वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनीही  धास्ती वाटतेय.....मात्र अशा कार्यपद्धतीमुळेच ते अनेक वेळा वादात सापडलेयत.गेल्या वर्षी 11 मार्चला ढोबळे यांनी मुंबई पोलीस दलाच्या समाज सेवा शाखेची  सूत्र हाती घेतली आणि त्यानंतर शहरात धाडसत्र सुरु झालं...ढोबळेंनी आज पर्यंत तब्बल 500 पेक्षा जास्त ठिकाणी छापे मारलेत.....आणि या छाप्यात 5000 पेक्षा जास्त जणांवर कारवाई केलीय.. यावरुन ढोबळेंच्या कार्यपद्धतीचा अंदाज तुम्हाला आला असेल...

 

मुंबईतील समाज सेवा शाखेच्या पथकाने वांद्र्यातील एका हुक्का पार्लरवर छापा मारला होता. या छाप्यात पोलिसांनी 22 जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यामध्ये महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांचा मुलगा क्षितीजचाही समावेश होता. य़ा हुक्का पार्लरमध्ये हे तरुण-तरुणी हुक्का पित असतांना पोलिसांना आढळून आले होते...

 

आरोग्यमंत्र्यांनी मात्र आपला मुलगा निर्दोष असल्याचा दावा केला होता.दोन महिन्यापूर्वी   हुक्का पार्लरवर करण्यात आलेली ही कारवाई एसीपी वसंत ढोबळेंच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती. या कारावईनंतर ढोबळेंच्या नावाची बरीच चर्चा सुरु झाली. कारण त्यांनी हुक्का पार्लवर बेधकपणे कारवाई केली होती. मंत्र्यांचा मुलगा छाप्यात सापडला असतानाही त्यांनी कारवाई करण्यात कुचराई केली नाही...हुक्का पार्लर असो की बार ढोबळे थेट  कारवाई करायला कचरत नाहीत..

15 एप्रिल रोजी विले पार्ल्यातल्या एका हॉटेलवर त्यांनी अशाच पद्धतीने कारवाई केली होती...या कारवाईत त्यांच्या खास स्टाईलचा अनुभव हॉटले चालकाला आला...साध्या कपड्यात त्यांनी कारवाई केली होती...हॉटेल समोरच्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचा दावा ढोबळेंनी केला होता. हॉटेल बंद करण्याची वेळ टळून गेल्यानंतरही हॉटेल मालकाने हॉटेल सुरु ठेवल्यामुळे ती कारावाई करण्यात आल्याचं पोलिसांकडून त्यावेळी सांगण्यात आलं होतं..

 

First Published: Thursday, June 14, 2012 - 23:37
comments powered by Disqus