राजीव गांधीच्या हत्येचे गूढ, IB hid crucial video on Rajiv Gandhi murder: Book

राजीव गांधीच्या हत्येचे गूढ

राजीव गांधीच्या हत्येचे गूढ
www.24taas.com
राजीव गांधींच्या हत्येपूर्वी काही मिनिटे आधी घेण्यात आलेली एलटीटीईच्या आत्मघातकी पथकाची दोन छायाचित्र सगळ्या जगाने पाहिली...त्याच दोन फोटोवरुन तपास यंत्रणांनी राजीव गांधींच्या खुन्यांना शोधून काढलं...पण आता एक नवीन माहिती समोर आलीय..राजीव गांधींच्या हत्येपूर्वी सभेच्या ठिकाणावरचा एक व्हिडिओ आयबीच्या हाती लागला होता...पण आजवर त्याची कुठेच वाच्यता करण्यात आली नाही हे विशेष

राजीव गांधी ....भारताला संगणक युगाची ओळख करुन देणारा नेता ... दुरद़ृष्टीच्या या नेत्याला केवळ पाच वर्षच भारताचं पंतप्रधानपद भोगता आलं ..कारण सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान यमदूत बनून आलेल्या एका महिलेनं राजीव गांधींचा घात केला...
एलटीटीईचा मानवी बॉम्ब ... राजीव गांधी हत्याकांडाने अवघ्या जगाला हादरुन टाकलं होतं...मृत्यूचा अकराळविकराळ चेहरा जगानं पाहिला होता....विशेष म्हणजे त्या घटनेचे फोटो काढण्याची जबाबदारी एलटीटीईने एका फोटोग्राफरवर टाकली होती..
पण या प्रकरणात आता नवीन आणि खळबळजनक माहिती उजेडात आली आहे.. राजीव गांधींच्या खुन्यांचे केवळ दोनचं फोटो उपलब्ध आहेत असं नाही तर बॉम्बस्फोटापूर्वीची चित्रफितही उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे...धक्कादायक बाब म्हणजे आज पर्यंत त्या चित्रफितीविषयी कोणतीच माहिती जनतेसमोर उघड करण्यात आली नव्हती....
राजीव गांधीच्या हत्येनंतर तब्बल २१ वर्षांनी हा गौप्यस्फोट झाला असून त्यामुळे संपूर्ण देश हादरुन गेला आहे...

राजीव गांधींची हत्याकरणापूर्वी त्यांच्या खुन्यांचं सभास्थळावरचं व्हि़डिओ शुटिंग उपलब्ध असल्याचा खळबळजनक दावा राजीव गांधी हत्याकांडातील मुख्य तपास अधिकारी के. राघोथामन यांनी
कॉन्स्पिरेसी टू किल राजीव गांधी - फ्रॉम सीबीआय फाईल्स या आपल्या पुस्तकात केलाय.

गुप्तचर खात्याचे तत्कालीन प्रमुख एम.के . नारायणन यांनी जानूनबूजून हा अत्यंत महत्वाचा पुरावा उघड केला नसल्याचा आरोप राघोथामन यांनी आपल्या पुस्तकात केलाय..
`आमच्या तपासानुसार राजीव गांधी हत्याकांडीतील आरोपी राजीव गांधींची सभा सुरु होण्यापूर्वी अडीच तास आधी स्टेराईल झोनमध्ये उभे होते`

ती चित्रफित जगासमोर न आल्यामुळेच तामिळनाडू पोलिसांच्या सुरक्षेविषयी कोणी सवाल केला नाही..राजीव गांधी सभास्थानी आल्यानंतरच धनूने स्टेराईल झोनमध्ये प्रवेश केल्याचा दावा तामिळनाडू पोलिसांनी केला होता..
तामिळनाडू पोलिसांना क्लिन चीट देण्याच्या उद्देशातून ती चित्रफिती दडपण्यात आली नव्हती तर अनेक बड्या नेत्यांना वाचविण्यासाठी ती चित्रफित आजपर्यंत उघड करण्यात आली नाही असा दावा राघोथामन यांनी आपल्या पुस्तकात केलाय..
तसेच एम.के नारायणन यांना या प्रकरणी सुरुवातीलाच क्लिन चिट देण्यात आली असून राजीव गांधींच्या हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या एसआयटीचे प्रमुख डी.आर. कार्तिकेयन यांनी एम.के नारायणन यांनी क्लिन चीट दिली होती..
राजीव गांधीच्या हत्येचे गूढ

राजीव गांधी हत्याकांड प्रकरणाचा तपास करणा-या पथकाचे प्रमुख के.राघोथामन यांनी आपल्या पुस्तकात केवळ त्या चित्रफितीचा उल्लेख केलाय असं नाही तर ज्या कारणामुळे ती चित्रफित जगासमोर आली नाही त्यावर मत नोंदवलं आहे..तत्कालीन आयबी प्रमुखांनी ती चित्रफित जाणून बुजून दडवून ठेवल्याचा आरोप राघोथामन यांनी केलाय..
राजीव गांधींची हत्या करण्यापूर्वी घेण्यात आलेली खुन्यांची केवळ ही दोनचं छायाचित्र उपलब्ध आहेत का ? राजीव गांधी हत्याकांडाच्या तपास पथकाचे प्रमुख राघोथामन यांनी केलेला गौप्यस्फोट अत्यंत महत्वाचा ठरणार आहे..राघोथामन यांच्या म्हणण्यानुसार राजीव गांधी यांच्या हत्येपूर्वी सभास्थळावरच्या हलचालिंची चित्रफित गुप्तचर विभागाला मिळाली होती...पण ती चित्रफित कधीच जनतेसमोर उघड करण्यात आली नाही..त्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले आहेत...

के. राघोथामन यांच्या म्हणण्यानुसार ते राजीव गांधी हत्याकांडाच्या तपास पथकाचे प्रमुख असतांना त्यांना ती चित्रफित तपासासाठी उपलब्ध करुन देण्यात आली नाही..पण न्यायाधीश जे.एस. वर्मा आयोगाच्या अहवालातून त्यांना या चित्रफितीची माहिती समजली होती..गुप्तचर विभागाचे तत्कालीन प्रमुख एम.के नारायणन यांनी तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेख यांना एक पत्र लिहिलं होतं ..त्या पत्राची एक प्रत वर्मा आयोगाच्या अहवालात राघोथामन यांना आढळून आली होती..ते पत्र २२ मे १९१९१ म्हणजेच राजीव गांधींच्या हत्येच्या दुस-या दिवशी लिहिण्यात आलं होतं..
`बैठकीच्या चित्रफितीची बारकाईने तपासणी केली जात असून त्यामुळे `त्या` महिलेची ओळख पटवण्यात मदत होणार आहे`
त्या पत्रात ज्या महिलेचा उल्लेख करण्यात आलाय ती महिला दुसरी तिसरी कुणी नसून एलटीटीईची मानवी बॉम्ब असल्याचा दावा राघोथामन यांनी पुस्तकात केलाय..राजीव गांधींच्या हत्येविषयी दुरदर्शनने दिलेल्या वृत्ताची चित्रफीत तसेच तो व्हिडिओ तामिळनाडु पोलीसांकडं सोपवण्यात आला होता..
राजीव गांधी हत्याकांडाचा तपास करणा-या एसआयटीचे प्रमुख डी.आर. कार्तिकेयन यांना त्या टेपची सत्यता तपासण्याचा आदेश वर्मा आयोगाने दिला होता..
`परंतु, कमिशनला सीबीआयने तो अहवाल दिलाच नाही
त्यामुळे एक.के.नारायणन यांनी पुरावे उघड होऊ न देण्याचा प्रयत्न तर केला नाही ना ?`
पी.व्ही नरसिंहराव यांच्या सरकारनेही त्या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर नारायणन यांच्या सह तत्कालीन कॅबिनेट सचीव आणि गृह सचिवांची चौकशी करण्याची शिफारस केली होती..
राघोथामन यांच्या म्हणण्यानुसार
एसआयटी प्रमुखांच्या दबावामुळे ते प्रकरण दडपण्यात आलं होत.
राघोथामन यांच्या या दाव्यामुळेच तत्कालीन गुप्तचर विभागाचे प्रमुख आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल एम.के. नारायणन यांच्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालंय..तसेच एसआयटी प्रमुख कार्तिकेयन यांच्या भूमिकेविषयी संशयाचं धुकं गडद झालंय..
राजीव गांधींच्या हत्येपूर्वीची चित्रफित उपलब्ध असतांना ती का दडपण्यात आली असा सवाल आता उपस्थित केला जात आहे..
राजीव गांधीच्या हत्येचे गूढ

राजीव गांधींची हत्या करण्यापूर्वी घेण्यात आलेली खुन्यांची केवळ ही दोनचं छायाचित्र उपलब्ध आहेत का ? राजीव गांधी हत्याकांडाच्या तपास पथकाचे प्रमुख राघोथामन यांनी केलेला गौप्यस्फोट अत्यंत महत्वाचा ठरणार आहे..राघोथामन यांच्या म्हणण्यानुसार राजीव गांधी यांच्या हत्येपूर्वी सभास्थळावरच्या हलचालिंची चित्रफित गुप्तचर विभागाला मिळाली होती...पण ती चित्रफित कधीच जनतेसमोर उघड करण्यात आली नाही..त्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले आहेत...
के. राघोथामन यांच्या म्हणण्यानुसार ते राजीव गांधी हत्याकांडाच्या तपास पथकाचे प्रमुख असतांना त्यांना ती चित्रफित तपासासाठी उपलब्ध करुन देण्यात आली नाही..पण न्यायाधीश जे.एस. वर्मा आयोगाच्या अहवालातून त्यांना या चित्रफितीची माहिती समजली होती..गुप्तचर विभागाचे तत्कालीन प्रमुख एम.के नारायणन यांनी तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेख यांना एक पत्र लिहिलं होतं ..त्या पत्राची एक प्रत वर्मा आयोगाच्या अहवालात राघोथामन यांना आढळून आली होती..ते पत्र २२ मे १९१९१ म्हणजेच राजीव गांधींच्या हत्येच्या दुस-या दिवशी लिहिण्यात आलं होतं..
राघोथामन यांच्या पुस्तकातून या संदर्भात अत्यंत महत्वाची माहिती उघड झालीय...
`बैठकीच्या चित्रफितीची बारकाईने तपासणी केली जात असून त्यामुळे `त्या` महिलेची ओळख पटवण्यात मदत होणार आहे`
त्या पत्रात ज्या महिलेचा उल्लेख करण्यात आलाय ती महिला दुसरी तिसरी कुणी नसून एलटीटीईची मानवी बॉम्ब असल्याचा दावा राघोथामन यांनी पुस्तकात केलाय..राजीव गांधींच्या हत्येविषयी दुरदर्शनने दिलेल्या वृत्ताची चित्रफीत तसेच तो व्हिडिओ तामिळनाडु पोलीसांकडं सोपवण्यात आला होता..
राजीव गांधी हत्याकांडाचा तपास करणा-या एसआयटीचे प्रमुख डी.आर. कार्तिकेयन यांना त्या टेपची सत्यता तपासण्याचा आदेश वर्मा आयोगाने दिला होता..
पी.व्ही नरसिंहराव यांच्या सरकारनेही त्या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर नारयणन यांच्या सह तत्कालीन कॅबिनेट सचीव आणि गृह सचिवांची चौकशी करण्याची शिफारस केली होती..
राघोथामन यांच्या म्हणण्यानुसार एसआयटी प्रमुखांच्या दबावामुळे ते प्रकरण दडपण्यात आलं होत.
राघोथामन यांच्या या दाव्यामुळेच तत्कालीन गुप्तचर विभागाचे प्रमुख आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल एम.के. नारायणन यांच्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालंय..तसेच एसआयटी प्रमुख कार्तिकेयन यांच्या भूमिकेविषयी संशयाचं धुकं गडद झालंय..
राजीव गांधींच्या हत्येपूर्वीची चित्रफित उपलब्ध असतांना ती का दडपण्यात आली असा सवाल आता उपस्थित केला जात आहे..
...
राजीव गांधी यांची हत्या झाली त्यावेळी गुप्तचर विभागाचे प्रमुख एम.के नारायणन हे होतो..पण त्यांनीच ती चित्रफित दडवल्याचा आरोप तत्कालीन एसआयटी प्रमुख के.राघोथामन यांनी केलाय..जर राघोथामन यांचा दावा खरा आहे असं मानल्यास ती चित्रफित दडवण्यामागे नारायणन यांचा हेतू काय होता असा प्रश्न उपस्थितीत झाल्याशिवाय राहात नाही..
एम.के नारायणन... राजीव गांधींच्या हत्येच्यावेळी गुप्तचर विभागाचे प्रमुख होते..माजी राष्ट्रीय सल्लागर...आणि पश्चिम बंगालचे विद्यमान राज्यपाल...पण आज हे एम.के.नारायणनं वादाच्या भोव-यात सापडण्याची शक्यता निर्माण झालीय..कारण राजीव गांधी हत्याकांडाच्या तपास पथकाचे प्रमुख के, राघोथामन यांनी ए.के. नारायणनं यांच्या विषयी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत..राजीव गांधींच्या हत्येपूर्वी चित्रित करण्यात आलेली चित्रफीत का दडपण्यात आली असा सवाल त्यांनी केला आहे..

या प्रश्नाने नवा वाद निर्माण केलाय..परंतू राघोथामन यांच्या म्हणण्यानुसार ती चित्रफित लपवण्यासाठी नारायणनं यांच्याकडं एक मोठं कारण होतं..
सभेच्या ठिकाणी धनू काही काँग्रेस नेत्यांशी बातचित करत असल्याचं त्या चित्रफितीतून दिसून आल्याचा दावा राघोथामन यांनी केलाय....
राजीव गांधी सभेच्या ठिकाणी आल्यानंतर गर्दीचा फायदा घेत धनू राजीव गांधींच्या अगदी जवळ जाऊन पोहोचल्याचा दावा तामिळनाडू पोलिसांनी केला होता.. राजीव गांधींच्या हत्येनंतर ती चित्रफित जनतेसमोर आली असती तर काँग्रेसला निवडणुकीत फटका बसला असता असा दावा राघोथामन यांनी केलीय..
राजीव गांधींच्या सुरक्षेत कुचराई झाली होती का ? या विषयी न्यायमुर्ती वर्मा आयोगानेही चौकशी केली होती..जून १९९२मध्ये वर्मा आयोगाने आपला अहवाल सादर केला..त्यामध्ये त्यांनी राजीव गांधीच्या सुरक्षेत कोणतीच कसर नसल्याचं स्पष्ट करत स्थानिक काँग्रेस नेत्यांमुळे थोडाफार गोंधळ झाल्याचं अहवालात नमुद केलं होतं...

माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या हत्येमुळे अवघा देश हादरुन गेला होता..ते दृष्य आजूनही लोकांच्या डोळ्य़ासमोरुन जात नाही....धनूने भलेही बॉम्बस्फोट घडवून राजीव गांधींची हत्या केली असली तरी या षडयंत्राची पाळंमुळं थेट श्रीलंके पर्यंत पोहोचल्याच पुढे उघड झालं..
याच दिवशी एलटीटीईच्या आत्मघातकी टोळीने तत्कालीन माजी पंतप्रधान राजीव गांधींची हत्या केली..निवडणूक प्रचारासाठी ते चेन्नईपासून काही अंतरावर असलेल्या श्रीपेरुंबदूर इथं गेले होते...सभेच्या ठिकाणी ते स्थानिक काँग्रेस नेत्यांशी भेटत होते..एका तामिळी काँग्रेस नेत्याच्या मुलीने हिंदीतून लिहिलेली कवीता त्यांनी ऐकली..आणि नंतर ते मंचाच्या दिशेनं निघाले..पण त्यांच्या वाटेत धनू मृत्यू बनून उभी होती....एलटीटीईने धनूला मानवी बॉम्ब बनवून पाठवलं होतं..
राजीव गांधी मंचाच्या पाय-या चढणार इतक्यात धनूने त्यांना वाटेत आडवलं...आणि गळ्या हार घालण्यासाठी ती पुढे सरसावली तसेच तिने राजीव गांधींच्या पाया पडण्याचा बहाणा केला..राजीव गांधी तिला सावरण्यासाठी खाली वाकले तेव्हड्यात धनूने आपल्या कमरेला असलेल्या बॉम्ब बेल्टचं बटन दाबलं आणि त्यानंतर प्रचंड मोठा स्फोट झाला..त्या बॉम्बस्फोटात राजीव गांधींसह १४जण ठार झाले
राजीव गांधींच्या हत्येनंतर धनु आणि शिवरासन यांचं हे छायाचित्र समोर आलं...एका फोटोग्राफरने ते छायाचित्र काढलं होतं..तो फोटोग्राफर त्या स्फोटात ठार झाला..एलटीटीईने त्या फोटोग्राफरवर फोटो काढण्याची जबाबदारी सापवली होती..मात्र पुढच्या घटनेविषयी विषय़ी त्याला कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती..एलटीटईच्या प्रशिक्षणासाठी त्या फोटोचा वापर करण्यासाठी एलटीटीईने ते फोटो काढले होते..
राजीव गांधींच्या हत्येचा आदेश एलटीटीई प्रमुख प्रभाकरण याने दिला होत असं बोललं जातंय..भारताने श्रीलंकेत शांतीसेना पाठविण्याचा निर्णय घेतला होता...त्यामुळे प्रभाकरण नाराज होता...राजीव गांधी पुन्हा सत्तेत आल्यास श्रीलंकेत शांतीसेना पाठवली जाईल अशी भीती प्रभाकरण याला वाटत होती..त्या भीतीतूनच प्रभाकरण याने मानवी बॉम्ब पथक तयार करुन त्यांच्यावर राजीव गांधीच्या हत्येची जबाबदारी सोपवली होती....त्या पथकाचा प्रमुख शिवरासन होता..त्याच्या देखरेखीखालीच धनूने कमरेवर बॉम्बचा बेल्ट बांधून राजीव गांधींची हत्या घडवून आणली..
राजीव गांधीच्या हत्येचे गूढ

राजीव गांधी हत्याकांडप्रकरणी मुरुगन, पेरारिवलन आणि संथन या तिघांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली..पण शिक्षा ठोठावून आज ११ वर्ष झाली तरी त्यांना अद्यापही फाशी झाली नाही..या तिघांनी या कटात कोणती भूमिका निभावली त्यावर एक नजर
माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या हत्येमुळे देश हादरुन गेला होता..१९९१चं हे दृष्य आजही जनतेच्या डोळ्यासमोरुन जात नाही...राजीव गांधींची हत्या भलेही धनून घडवू आणली असली तरी या षडयंत्रात मुरुगन,संथन आणि पेरारिवालन यांनी महत्वाची भूमिका बजावली होती..
२१ मे १९९१ ला राजीव गांधी निवडणुक प्रचारासाठी चेन्नईहून काही अंतरावर असलेल्य़ा श्रीपेरुंबदूर इथं गेले होते..आणि तिथचं एलटीटीईच्या धनूने बॉम्बस्फोट घडवून राजीव गांधींची हत्या केली...
राजीव गांधींच्या हत्येचा तपास करणा-या एसआयटीच्या म्हणण्यानुसार राजीव गांधींच्या हत्येचा कट तामिळ दहशतवादी संघटना एलटीटटीईचा प्रमुख प्रभाकरन याने रचला होता...त्यासाठी त्याला एलटीटीईच्या गुप्तचर विभागाचा प्रमुख पोट्टू अम्मन आणि महिला आघाडीची प्रमुख अकिला या दोघांनी मदत केली होती..पण तो कट प्रत्यक्षात तडीस नेला मानवी बॉम्ब गटाचा प्रमुख शिवरासन आणि शुभा या दोघांनी...
हत्याकांडाच्या योजनेत मुरुगनची भूमिका
एसआयटीच्या तपासानुसार मुरुगनने आरोपींनी चेन्नईत आश्रय दिला होता..तसेच हल्ल्य़ासाठी इतर मदत केली होती..मुरुगन यानेच नलिनीला राजीव गांधी हत्याकांडात सहभागी करुन घेतलं होतं..पुढे मुरुगन याने नलिनीशी विवाह केला ..नलिनीच्या म्हणण्यानुसार श्रीपेरुंबदूर इथं पोहचे पर्यंत राजीव गांधीची हत्या होणार असल्याचं आपल्याला माहित नव्हतं असा दावा नलिनीने केला होता..
राजीव गांधी हत्याकांडप्रकरणी पेरारिवलनला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलीय...बॉम्बस्फोटासाठी ज्या ९ होल्टच्या बॅटरीजचा वापर केला होता त्या बॅटरीज पेरारिवलन याने खरेदी केल्या होत्या... त्याला संपूर्ण कटाची माहिती होती..
खूनाच्या कटात संथनची भूमिका
श्रीलंकेचा नागरिक असलेला संथन हा एलटीटीईच्या मानवी बॉम्ब पथकाचा महत्वाचा सदस्य होता..शिवरासन सह तो राजीव गांधीची हत्या करण्यासाठी तमिळनाडूत आला होता..बॉम्ब तयार करण्यात त्याने महत्वाची भूमिका बजावली होती..

First Published: Wednesday, October 31, 2012, 22:27


comments powered by Disqus