साज महालक्ष्मीचा

Last Updated: Wednesday, October 5, 2011 - 14:45

झी 24 तास वेब टीम, कोल्हापूर

 

महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठातील एक शक्तीपीठ म्हणजे कोल्हापूर. याच कोल्हापूरचीसर्वात महत्वाची ओळख म्हणजे आई महालक्ष्मीचं कोल्हापूर. पण नवरात्रीच्या काळातदेवीचे तेज काही अनुपम्य असचं असत. यातच भर म्हणजे या  तेजाला झळाळी चढतेजेव्हा, नवरात्रीत देवीला दागिन्यांचा बावनकशी साज चढवला जातो त्यावेळेस.

 

सोन्याचा किरीट, सोन्याची कुंडलं, सोन्याचे मयूर, सोन्याची ठुशी, सोन्याचा गळसर,सोन्याचा चपलाहार, पुतळ्याची माळ, सोन्याची कंठी, चिंचपेटी, गोलपक्षी, चंद्रहार, बोरमाळ,म्हाळुंग, हा दागिन्यांचा खजिना आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा. नवरात्रोत्सवाच्या काळातमहालक्ष्मीच्या अंगावर या मौल्यवान दागदागिन्यांचा साज चढविला जातो. देवीचं ऐश्वर्यडोळे दीपवून टाकणारं आहे. हे दागदागिने अत्यंत प्राचीन आहेत.

 

कोल्हापूरचे राजे दुसरे संभाजी यांनीही महालक्ष्मीला दागिने अर्पण केले होते. देवीच्याखजिन्यात असलेल्या या दागिन्यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे या दागिन्यात हिरे ,माणिक, मोती बसविले आहेत. सर्वसामान्यांपासून ते राजे-महाराज्यांपर्यंत महालक्ष्मी अनेकांच कुलदैवत असल्यामुळं भक्त आपल्या यथाशक्ती देवीच्या चरणी दान अर्पण करतात.

 

[caption id="attachment_1834" align="aligncenter" width="225" caption="आई उदे गं.. अंबे उदे.."][/caption]

या दागिन्यांमध्ये महालक्ष्मीचं रुप अत्यंत लोभस दिसत.  साडेतीन शक्तीपीठापैकी प्रमुखपीठ अशी कोल्हापूरच्या महालक्ष्मीची ख्याती आहे. नऊ दिवस देवीला नखशिखांत दागिन्यांनी सजवलं जातं. देवीचं हे रुप डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी दरवर्षी लाखो भक्त येतात.  देवीचे हे दागिने नवरात्रौत्सवाच्या काळातच पाहायला मिळतात. देवीच्या अंगावर सजविण्यात येणाऱ्या या दागिन्यांनी सर्वसामान्य महिलांना मोहिनी घातली नाही तर नवलच.

 

साक्षात तिरुपतीसारखे यजमान असलेल्या महालक्ष्मीचं देखणेपण अवर्णनीय असंचआहे. नवरात्रीत देवीची वेगवेगळी रुप पाहायला मिळतात. नवरात्रीदरम्यान देवीच्याखजिन्यातील सगळे दागिने देवीच्या अंगावर घातले जातात. महालक्ष्मीवर श्रद्धाअसणाऱ्यांमध्ये सर्वसामान्य़ांपासून ते नेते आणि अभिनेत्यांचाही समावेश आहे.

 

गानसम्राज्ञी लता मंगेशकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते वसंतडावखरे यांचीही महालक्ष्मीवर श्रद्धा आहे आणि त्या श्रध्देतूनच या दिग्गजांनी देवीच्याचरणी दागिने अर्पण केले आहेत. देवीचं हे ऐश्वर्य याचि देही याचि डोळा पाहण्याचा अनुभवकाही वेगळाच आहे.

 

कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे सर्वात वेगळेपणं म्हणजे नवरात्रीच्या काळात महालक्ष्मीच्याबांधल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या आकर्षक पूजा. नऊ दिवस महालक्ष्मीची नऊ रुपे भक्तानांपाहायला मिळतात. मुळातच तेजोमय असलेल्या महालक्ष्मीच्या मूर्तीच्या पूजेचा साजपाहण्यासाठी भक्त नऊही दिवस अलोट गर्दी करतात.

 

देवीच्या महतीला देवीच्या आकर्षक पूजेचे कोंदण आणि त्यातही वैविध्यपूर्ण पूजा म्हणजेभक्तांना नऊ दिवसात मिळणारा एक उत्कटानुभवचं असतो. सूर्याच्या दक्षिणायन आणिउत्तरायण यांचा अचूक अभ्यास करुन महालक्ष्मीच्या मंदिराची बांधणी करण्यात आलीय. महालक्ष्मीची लोभस मूर्ती रत्नशिलेची आहे. महालक्ष्मीची मूर्ती चतुर्भुज असून  तिच्या हातात मातृलिंग, गदा, ढाल आणि पानपात्र धारण केले आहे.  डोक्यावर नागछायाआणि सयोगीलिंग धारण केले आहे.

 

पश्चिमाभिमुख असलेले हे मंदिर हेमाडपंथी बांधणीचे असून मंदिर परिसरात वेगवेगळ्यादेवतांची मंदिरे आहेत. मुख्य मंदिराला असलेली पाच शिखरे आणि तारकाकृती रचना यामुळे मंदिराचे शिल्पसौदंर्य़ भाविकांनाच नाही तर वास्तु अभ्यासकांनाही नेहमीच मोहिनीघालते. पांरपरिक प्रासादिकता, जागृतता याचबरोबर भव्यता आणि अपूर्व सौंदर्य हा सारानजारा केवळ नवरात्रीतच नाही तर वर्षभर महालक्ष्मीच्या मंदिरात झळकत असतो.

 

नवरात्रौत्सवाच्या काळात हे मंदिर लक्ष लक्ष दिव्यांनी झळाळून जाते, तेव्हा मंदिराच्यागाभा-यात समईच्या प्रकाशातल्या महालक्ष्मीच्या तेजाने जणू विश्वच उजळून गेल्याचाभास झाला नाही तरच नवल.

First Published: Wednesday, October 5, 2011 - 14:45
comments powered by Disqus