बकवास, पण हसवणार ‘खिलाडी 786’

अभिनेता अक्षय कुमारचा खिलाडी सिरिजमधील आणखी एक चित्रपट खिलाडी 786 आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 7, 2012, 05:48 PM IST

चित्रपट: खिलाड़ी 786
कलाकार: अक्षय कुमार, असिन, मनोज जोशी
निर्देशक: आशीष मोहन
स्टार - ***
अभिनेता अक्षय कुमारचा खिलाडी सिरिजमधील आणखी एक चित्रपट खिलाडी 786 आहे. या अक्षयचा जलवा आपल्या पाहायला मिळणार आहे. तुम्हांला टॉयलेट ह्युमर, चटकदार रंगाचे कपडे आणि धडाकेबाज संगीत याची आवड असेल तर तुम्ही हा पिक्चर पाहायला हरकत नाही.
काय आहे काहणी
अक्षय कुमार पंजाबचा एक पहेलवान आहे त्याचे नाव बहत्तर सिंह आहे. बहत्तर सिंग हा एक पोलिस आहे जो सीमाभागातील तस्करांना गजाआड टाकतो. या कामात त्याला सत्तर सिंह (राज बब्बर) आणि इक्हत्तर सिंग (मुकेश ऋषि) मदत करतात.
आपल्या कामामुळे बहत्तर सिंग आपल्या कुटुंबाला जास्त वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे तो दुःखी असतो. दुसरीकडे मुंबईतील तात्या तुकाराम तेंडुलकर (टीटीटी) हा एक डॉन ज्याची भूमिका मिथून चक्रवर्तीने साकारली आहे. तो आपली बहीण इंदू (आसिन) हिच्यासाठी चांगल्या मुलाच्या शोधात असतो. उत्तरेतील बहत्तर सिंह आणि पश्चिमेची इंदू यांना एकत्र आणण्याचे काम मनसुख (हिमेश रेशमिया) एक मॅचमेकर (लग्न जुळवणार) घडवून आणतो.
या चित्रपटात तुम्हाला हसू येणार नाही असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार आहे. काही पाचळक विनोद यात टाकण्यात आले आहेत. यातील अक्षयचा इंटरनॅशनल कुटुंब काही प्रमाणात हसविण्यात यशस्वी ठरला आहे. ज्यात कॅनेडियन आई, चिनी वहिनी आणि आफ्रिकन आत्या यांचा समावेश आहे.
अभिनय कसा झाला
अक्षय याच्या भूमिकबद्दल बोलायचे झाले तर त्याचा गेटअप हुबेहूब सलमान खानच्या दबंग सारखा आहे. पोलिसाची खाकी वर्दी आणि बेनचा चश्मा. आपल्या अभिनयाने त्याने सिनेमागृहात शिट्ट्या वाजवण्यास प्रेक्षकांना भाग पाडले आहे. आपल्या ढिशूम ढिशूम रोलमुळे तो पुन्हा एकदा अक्शन हिरो म्हणून प्रेक्षकांना दिसणार आहे. मात्र, पिंक आणि लाल कुर्त्यामध्ये सोनेरी रंगाच्या बुटांमध्ये अक्षय फारच विचित्र दिसला आहे.
आसिनच्या बाबतीत बोलायचे झाले तर संपूर्ण चित्रपटात एक सारखे भाव घेऊन ती वावरली आहे. एक कलाकार म्हणून ती या चित्रपटात फ्लॉप ठरली आहे. या चित्रपटात तीने फक्त आपल्या लुक्सवरच लक्ष केंद्रीत केले आहे.

मिथुनदाने पडद्यावर सशक्त अभिनयाचे प्रदर्शन केले आहे. मात्र, त्यांना फार कमी पडद्यावर झळकविण्यात आले आहे. दुसरीकडे हिमेश रेशमिया यांनी केवळ अभिनय केला नाही तर चित्रपटाचे गीतकार, संगीतकार आणि लेखकही तेच आहेत. त्याचे यातील हुक्काबार आणि लाँग ड्राइव हे गाणे नव्या वर्षात डान्स फ्लोअरवर आग लावणार यात काही शंका नाही.

खिलाडी 786 नाव का
या चित्रपटाचे नाव खिलाडी 786 का ठेवण्यात आले हे समजले नाही. अक्षय कुमारच्या चित्रपटात तर्क शोधणे मुर्खपणाचे ठरणार आहे. चित्रपटात अनेक सिन कुठल्या तरी चित्रपटातून घेतल्या सारखे वाटतात. चित्रपट तर्कहिन आहे. पण काही प्रमाणात हसविणारा आहे.