वेदनेची २० वर्षे

By Jaywant Patil | Last Updated: Tuesday, March 12, 2013 - 23:56

www.24taas.com, मुंबई
साखळी बॉम्बस्फोटामुळे संपूर्ण देश हादरुन गेला होता...मुंबई रक्ताने न्हावून निघाली होती...हे का घडलं ? कोणी घडवून आणलं ? असा प्रश्न त्यावेळी मुंबईकरांना प़डला होता..पण जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला तेव्हा या भीषण बॉम्बस्फोटा मागच्या सूत्रधाराचा चेहरा समोर आला...

12 मार्च 1993

मुंबई शहर साखळी बॉम्बस्फोटाने अक्षरश: हादरुन गेलं होतं...हे काय घडतंय ? का घडतंय ? हे कोणी केलं ? असे एक ना अनेक प्रश्न मुंबईकरांच्या डोक्यात घोळत होते...पण सीबीआयने जेव्हा या प्रकरणाचा तपास केला तेव्हा या भयंकर षडयंत्रा मागच्या सूत्रधारांचा पर्दाफाश झाला..त्या गद्दारांनी पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर यंत्रणा आयएसआय़शी हातमिळवणी करुन आपल्याच देशातील नागरिकांचा बळी घेतला होता...कोणी रचलं होतं हे षडयंत्र ?कोणी केला रक्तपात ? हे आम्ही उलगडून दाखवणार आहोत.....हा चेहरा बघीतल्यानंतर मुंबईकरांच्या तळपायाची आग मस्तकात जाते.....भारतातील सगळ्या तपास यंत्रणा याच्या मागावर आहेत...कारण हाच तो चेहरा ज्याने १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा कट आखला होता...अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर मुंबई साखळी बॉम्बस्फोटाच्या वेळी दुबईत होता...मात्र तिथ बसूनच त्याने मुंबई ब़ॉम्बस्फोटाचा कट तडीस नेला...मुंबईतील त्याचा हस्तक टायगर मेमनवर दाऊदने ही जबाबदारी सोपवली होती...या बॉम्बस्फोटानंतर भारत सरकारने दाऊद विरोधात इंटरनॅशनल रेड कॉर्नर नोटीस जारी केलं... तसेच दाऊद पाकिस्तानात असल्याचे अनेक पुरावे दिले तरी पाकिस्तान मात्र दाऊद पाकिस्तानात असल्याचं मान्य करायला तयार नाही..दाऊद आजही आयएसआयच्या छत्रछायेखाली कराचीत लपून बसला आहे...दाऊद दुबईतून बॉम्बस्फोटाची सूत्र हलवीत होता...तर मुंबईत टायगर मेमन त्याची प्रत्येक्षात अंमलबजावणी करत होता...मुंबई बॉम्बस्फोटापूर्वीची टायगर मेमनने एक मिटींग घेतली होती..मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणल्यानंतर टायगर मेमन मुंबईतून फरार झाला..दुबई मार्गे तो पाकिस्तानात पोहोचला..इंटरपोलने १९९३मध्ये टायगर मेमनच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केलं..पण आजही तो पोलिसांच्या हाती लागला नाही..
ताहीर मर्चंट
मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटात सहभागी असलेल्यांपैकी ताहीर मर्चंट हा एक प्रमुख आऱोपी आहे..बॉ़म्बस्फोटासाठी अंडरवर्ल्डची टीम तयार करण्याची जबाबदारी ताहीर मर्चंटवर होती...तसेच स्फोटकं आणि पैसा पुरवण्याचं काम ताहीरने केलं..बॉम्बस्फोटानंतर आरोपींना लपवण्यासाठी आश्रयही त्यानेच मिळवून दिला होता....पोलिसांना त्याच्या या कारनाम्याची खबर लागण्यापूर्वीच तो फरार झाला होता..
छोटा शकील
अनिस इब्राहिम
मोहम्मद डोसा
मुस्तफा डोसा
शेख करीमुल्ला
कादरी शब्बीर सय्यद
अब्दूल मुनाफ माजीद
अबू सालेम

मुंबई बॉम्बस्फोटाचा कट तडीस नेहण्यास यांनी महत्वाची भूमिका बजावली होती..यातले काही आऱोपी पोलिसांच्या हाती लागले असले तरी या कटाचा मास्टर माईंड दाऊद इब्राहिम कासकर मात्र अजूनही मोकाटच आहे..तो कधी पोलिसांच्या हाती लागणार आणि त्याला शिक्षा कधी होणार असा प्रश्न आज २० वर्षानंतरही अनुत्तरीतचं आहे..

First Published: Tuesday, March 12, 2013 - 23:40
comments powered by Disqus