मैत्री असावी तर अशी!

By Jaywant Patil | Last Updated: Thursday, August 16, 2012 - 08:13

कैलास पुरी,www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
पिंपरी चिंचवडमधल्या सेंट ज्यूड शाळेतल्या विद्यार्थ्यांनी मैत्री कशाला म्हणतात याचं अनोखं उदाहरण सा-यांना दिलंय.. अपघातात जखमी झालेल्या मित्राच्या उपचारासाठी या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या खाऊच्या पैशांचीही तमा बाळगली नाही.
पिंपरी चिंचवडच्या देहू रोड इथल्या सेंट ज्यूड स्कूलमध्ये नववीत शिकणाऱ्य़ा स्टॅलिन स्टीवन बर्डेचा शाळेतून परतत असताना वाहनानं धडक दिली. या अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार लागलाय तर एक हात फ्रॅक्चर झालाय.. त्याच्यावर उपचारासाठी सुमारे 3 ते 4 लाख रुपये खर्च अपेक्षित आहेत.. मात्र घरची हलाखीची परिस्थिती असल्यानं हॉस्पिटलचा खर्च कसा झेपणार या विवंचनेत स्टॅलिनचे कुटुंबीय होते.. त्याचवेळी स्टॅलिनच्या मदतीसाठी त्याचे वर्गमित्र धावलेत... या विद्यार्थ्यांनी खाऊचे पैसे गोळा केलेत.. वर्गमित्रासाठी विद्यार्थ्यांमधली ही माणुसकी पाहून शिक्षकही भारावून पुढं आले.. विद्यार्थ्यांसह त्यांनी 50 हजार रुपये जमा केले..हेच पैसे आता रुग्णालयात जमा करण्यात आलेत.. उरलेला खर्चही सोपा व्हावा यासाठी हे विद्यार्थी झटतायत...
शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या या संवेदनशीलतेमुळं स्टॅलिनवर उपचार करणारे डॉक्टरही भारावलेत.. या विद्यार्थ्यांप्रमाणेच इतरांनीही त्याला मदत करावी अशी भावना त्यांनी व्यक्त केलीय..
रोजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात कोणी कुणाचा विचार करत नाही.. मात्र आपल्या वर्गमित्राच्या उपचारासाठी खाऊचे पैसे जमा करुन पिंपरीतल्या या शाळकरी मुलांनी माणुसकीचं दर्शन घडवलंय.. त्यांचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे.. या विद्यार्थ्यांप्रमाणे समाजातल्या इतर दानशूर व्यक्तींनीही स्टॅलिनच्या उपचारासाठी मदतीचा हात द्यावा हीच अपेक्षा...

First Published: Thursday, August 16, 2012 - 08:13
comments powered by Disqus