अघोरी !

By Jaywant Patil | Last Updated: Tuesday, May 14, 2013 - 00:02

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मैत्रिचं नातं हे रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ मानलं जातं.....पण चाकणमधल्या एका मित्राने मात्र मैत्रिलाच काळीमा फासलाय..त्याने जे कृत्य केलंय हे अघोरी असच आहे...
नाव : सुनिल बबन पाचंगे
वय : 28
राहणार : चाकण, पुणे
पुण्यातल्या चाकण पोलिसांनी या सैतानाला दुहेरी खूनप्रकरणी जेरबंद केलंय...त्याने आपला मित्र धनंजय आणि त्याची आई दुर्गा जगताप या दोघांचा निर्दयपणे खून केलाय...जादूटोळा करण्यासाठी सुनिलने हे अघोरी कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे...

एका मांत्रिकाच्या सांगण्यावरुन सुनिलने हे सैतानी कृत्य केल्याचं संशय असून पैसा हा त्यामागचं कारण असल्याचं बोललं जातंय...
अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आरोपीने धनंजय आणि त्याच्या आईचा खून केला होता..तसेच आपला गुन्हा उघडकीस येवू नये याची आरोपीने पुरेपूर काळजी घेतली होती...मयत दुर्गाबाई जगताप यांचा मृतदेह विहिरीत आढळून आल्यामुळे या प्रकरणाला वाचा फुटली...
हा खूनाचा प्रकार असल्याचं लक्षात आल्यावर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.... दुर्गाबाईची ओळख पटण्यासाठी पोलिसांनी त्यांची भित्तीपत्रकं तयार करुन लावावी लागली होती...मात्र त्यांची ओळख पटल्यानंतर तपासाला वेग आला आणि सुनिल पाचंगेवर संशय बळावला..पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर आरोपीने दुर्गाबाईच्या खूनाची कबुली दिली... गळा चिरुन त्याने त्याने दुर्गाबाईची हत्या केली होती...
दुर्गाबाईंच्या खुनाचा उलगडा झाला होता पण धनंजयचा मात्र शोध लागत नव्हता...आऱोपी सुनिल उडवा-उडवीची उत्तर देत होता...पण पोलिसांनी आरोपीकडं पुन्हा चौकशी केल्यावर धनंजयच्या खूनाचा उलगडा झाला...
आरोपी सुनिलने मित्र धनंजय आणि त्याची आई दुर्गाबाई या दोघांची अत्यंत थंड डोक्याने हत्या केल्याच तपासात उघड झालंय...ज्या मांत्रिकाने सुनिलला हा सल्ला दिला होता त्याचा शोध आता पोलीस घेत असून या दुहेरी हत्याकांडामुळे पुणे परिसरात एकच खळबळ उडालीय..
चाकणमध्ये घडलेल्या दुहेरी हत्याकांडामुळे एकच खळबळ उडालीय... अंधश्रद्धेतून हे हत्याकांड घडलं असावं, असा पोलिसांना संशय आहे...पण अशा घटना का घडतात ? लोक नरबळी सारखं अघोरी कृत्य करायला का धजावतात ? असे अनेक प्रश्न निर्माण झालेत.
अमावस्येच्या रात्री बळी देऊन अघोरी शक्ती प्राप्त करणारा मांत्रिक तुम्ही अनेक चित्रपटातून बघीतला असेल...पण रुपेरी पडद्यावरची कहाणी जेव्हा वास्तवात उतरते तेव्हा काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय रहात नाही... धक्कादाय बाब म्हणजे आजच्या महितीतंत्रज्ञानाच्या युगातही लोकांचा तंत्रमंत्रांवर विश्वास आहे...आणि त्यासाठी लोक नरबळी द्यायलाही मागेपुढे पहात नाहीत.....
"नरबळी" एक असा अंधविश्वास ज्यामुळे माणूस सैतानासारखा वागतो.. तो माणसाचाच वैरी बनतो आणि अघोरी इच्छापूर्तीसाठी नरबळी देण्यासही तयार होतो.. अशा घटनांमुळे समाजात एक वेगळी दहशत निर्माण होते.. मांत्रिकाच्या नादी लागून काही लोक जे काही करतात त्याचं सत्य जेव्हा जगासमोर येतं तेव्हा समाज हदरुन जातो...
देशात अंधश्रद्धेतून यापूर्वीही अनेक कोवळ्या जीवांचा बळी देण्यात आला आहे..हे सगळे निरागस चेहरे त्यापैकीच आहेत...त्यांचं वय, जात, धर्म वेगवेगळे असले तरी त्यांच्यात एक साम्य आहे आणि ते म्हणजे जादूटोण्य़ाच्या नावाखाली त्यांचा नाहक बळी देण्यात आलाय. अंधविश्वासाने त्यांचा घात केलाय...आणि म्हणूनच प्रश्न पडतो..
कधी थांबणार हा रक्तरंजित खेळ ?
अघोरी अंधश्रध्देला कसा लागणार लगाम ?

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, May 14, 2013 - 00:02
comments powered by Disqus