गर्दीला दुर्घटनेचा शाप

कुंभ मेळ्यासाठी देशविदेशातून लाखो भाविक अलाहाबादमध्ये दाखल झाले. अत्यंत शांततेत हा कुंभमेळा पार पडत असतांनाच एका दुर्घटनेचं त्याला गालबोट लागलं.

जयवंत पाटील | Updated: Feb 11, 2013, 11:40 PM IST

www.24taas.com, मुंबई
कुंभ मेळ्यासाठी देशविदेशातून लाखो भाविक अलाहाबादमध्ये दाखल झाले. अत्यंत शांततेत हा कुंभमेळा पार पडत असतांनाच एका दुर्घटनेचं त्याला गालबोट लागलं. अलाहाबाद रेल्वे स्टेशनवर फूटओव्हर ब्रीजचा कठडा तुटला आणि त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत ३६ जणांना आपला जीव गमवावा लागला. वारंवार अशा घटना घडत असतांनाही प्रशासन त्यातून कोणताच धडा घेतांना दिसत नाही..
तारीख
१० फेब्रुवारी २०१३
------------
ठिकाण
अलाहाबाद रेल्वे स्टेशन
कुंभमेळ्यासाठी आलेल्या भाविकांची रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी होती...त्याचवेळी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर सहावरचा फूटओव्हर ब्रीजचा कठडा तुटला आणि तिथ एकच गोंधळ उ़डाला...त्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि त्यात ३६ जण ठार तर 10 जण जखमी झालेत. मृतांमध्ये 26 महिला तर नऊ पुरुषांचा समावेश आहे.मात्र ही दुर्घटना रेल्वेचा फूटओव्हर ब्रीजचा कठडा तुटल्यामुळे झाली नसल्याचा दावा रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी केला.
या दुर्घटनेत निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागलाय. मात्र या दुर्घटनेवरुन आता आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. आता या दुर्घटनेची चौकशी होईल आणि काही काळानंतर ही घटना विस्मृतीत जाईल... पण अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाय योजना काही होतांना दिसत नाहीत...गेल्या काही वर्षातील अशा घटनांवर नजर टाकल्यास हेच दिसून येईल.

तारीख
१५ जानेवारी २०१२
--------
ठिकाण
रतलाम
---------
चेंगराचेंगरीत
१० ठार

तारीख
१४ जानेवारी २०११
--------
ठिकाण
शबरीमाला (केरळ)
---------
चेंगराचेंगरीत
१०४ ठार
तारीख
नोव्हेंबर २०१०
--------
ठिकाण
हरिद्वार
---------
चेंगराचेंगरीत
२० ठार
तारीख
४ मार्च २०१०
--------
ठिकाण
प्रतापगड ( उत्तरप्रदेश )
---------
६३ ठार
तारीख
३०सप्टेंबर २००८
--------
ठिकाण
जोधपूर
---------
चेंगराचेंगरीत
२१६ ठार
तारीख
३ ऑगस्ट २००८
--------
ठिकाण

नैनादेवी मंदिर (हिमाचल प्रदेश)
---------
चेंगराचेंगरीत
१५० ठार
तारीख
जानेवारी २००५
--------
ठिकाण
मांढरदेवी मंदिर( सातारा)
---------
चेंगराचेंगरीत
३४० ठार
तारीख
ऑगस्ट २००३
--------
ठिकाण
नाशिक
---------
चेंगराचेंगरीत
२९ ठार

या सगळ्या घटना गर्दीच्या ठिकाणी घडल्या आहेत...गर्दीच्या ठिकाणी नियोजनचा अभाव असल्यामुळेच अशा घटना वारंवार घडत असल्याचं उघड झालंय....भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी गर्दीचं नियोजन करणं अनिवार्य आहे...मात्र अस असतांनाही दुर्देवाने वारंवार अशा दुर्घटना घडत आहेत...