दिल्लीकरांचे सिंघम...केजरीवाल

By Surendra Gangan | Last Updated: Thursday, January 2, 2014 - 09:04

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्ली विधानसभेची ही स्थिती असताना सध्या अरविंद केजरीवाल मात्र दिल्लीकरांचे सिंघम ठरलेत. आल्या-आल्या मोफत पाणी आणि स्वस्त विजेचा निर्णय घेऊन त्यांनी दिल्लीकरांची मनं जिंकली आहेत. मात्र यामुळे बाकीच्या पक्षांची अवस्था बिकट केली आहेच, पण इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही पेचात टाकलंय.
निवडणुकीआधी आम आदमी पार्टीनं दिलेली आश्वासनं अवघ्या 3 दिवसात पूर्ण केलीयेत. दिल्लीकरांना दिवसाला ६६८ लीटर पाणी आणि वीजेच्या बिलात 50 टक्के सबसिडी देण्यात आलीये. अर्थातच, दिल्लीकरांनी या निर्णयांचं जोरदार स्वागत केलंय.
केजरीवाल यांच्या या धडाक्यानं इतर राजकीय पक्षांच्या मात्र पोटात दुखायला लागलंय. हा निर्णय आर्थिकदृष्ट्या अयोग्य असल्याची टीका होतेय. पण याआधीही अनेक सरकारांनी अशा योजना आणून जनतेला दिलासा दिल्याचं ज्येष्ठ पत्रकार सांगतात. आपवर होत असलेली टीका आसुयेपोटी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
याचा परिणाम आता अन्य राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसणार आहे... केजरीवाल सवलती देऊ शकतात, तर तुम्ही का नाही, असे प्रश्न आता सगळ्याच मुख्यमंत्र्यांना विचारले जाऊ शकतात... संजय निरुपम यांनी याची झलक महाराष्ट्रात दाखवली आहेच...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, January 2, 2014 - 09:04
comments powered by Disqus