ऑडिट मावळ लोकसभा मतदारसंघाचे!

लोकसभा मतदारसंघात की जो निम्मा ग्रामीण आणि निम्मा शहरी असा आहे. २००८ च्या पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलेला नवा मतदारसंघ. तो आहे, मावळ लोकसभा मतदारसंघ. २००८ च्या पुनर्रचनेनंतर तयार झालेला हा मावळ लोकसभा मतदारसंघ... पुणे आणि रायगड जिल्ह्याचा निम्मा भाग जोडून तो तयार झालाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 9, 2014, 10:25 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मावळ
लोकसभा मतदारसंघात की जो निम्मा ग्रामीण आणि निम्मा शहरी असा आहे. २००८ च्या पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलेला नवा मतदारसंघ. तो आहे, मावळ लोकसभा मतदारसंघ. २००८ च्या पुनर्रचनेनंतर तयार झालेला हा मावळ लोकसभा मतदारसंघ... पुणे आणि रायगड जिल्ह्याचा निम्मा भाग जोडून तो तयार झालाय. पुणे जिल्ह्यातले पिंपरी, चिंचवड, मावळ आणि रायगड जिल्ह्यातले कर्जत, उरण आणि पनवेल असे तीन विधानसभा मिळू्न तयार झालेला हा मतदारसंघ. भौगोलिक परिस्थितीचा विचार केल्यास हा मतदारसंघ मुंबईच्या लगत आहे.
हा भाग विविधतेने नटलाय... पिंपरी चिंचवडचा भाग औद्योगिक तर मावळ भात शेतीसाठी प्रसिद्ध आहे. कर्जत, उरण आणि पनवेल हे कोकणाचं प्रतिनिधित्व करणारे विभाग. पिंपरीतलं मोरया गोसावी मंदिर राज्यातल्या गणेश भक्तांच श्रद्धास्थान तर लोणावळ्याजवळची एकवीरा देवी अनेकांचं कुलदैवत. लोकांना आकर्षित करणारी लोणावळा-खंडाळा ही पर्यटनस्थळं, कार्ल्याची प्रसिद्ध लेणी याच मतदारसंघात आहेत. मतदारसंघात ६० टक्के लोकं ग्रामीण भागात राहतात तर उरलेले ४० टक्के निमशहरी आणि शहरी भागात राहतात.
- २००९ च्या लोकसभा निवडणुकीत एकूण १६ लाख ४ हजार ८८६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी पुरूष मतदारांची संख्या ही ८ लाख ५० हजार ९७२ होती तर ७ लाख ५३ हजार ९१७ महिलांनी मतदान केलं होतं.
- २००९ मध्ये नव्यानंच तयार झालेल्या मावळ मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचंच वर्चस्व असल्याचं पाहायला मिळतं. मतदार संघातल्या जिल्हा परिषदा असोत, वा पंचायत समित्या, राष्ट्रवादी काँग्रेसचंच वर्चस्व याठिकाणी आहे. परंतु इथला खासदार मात्र शिवसेनेचा आहे.
-राष्ट्रवादी काँग्रेसला आता हा मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे खेचून आणायचा आहे. परिणामी आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी तुल्यबळ रंगतदार लढत इथं पाहायला मिळण्याची चिन्हं आहेत.

मावळचे शिवसेनेचे शिलेदार म्हणजेच मावळ लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार गजानन बाबर. कुठलाही राजकीय वारसा नसताना, केवळ कट्टर शिवसैनिक ही गजानन बाबर यांची ओळख... शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासामुळेच राजकारणातील थक्क करणारा प्रवास ते करू शकले. पिंपरी महानगरपालिकेत नगरसेवक, सलग दोनदा विधानसभेत आमदार आणि आता मावळचे खासदार अशी त्यांची आजवरची राजकीय वाटचाल... पिंपरी चिंचवडमधील बहुतांश लोकांना खासदार गजानन बाबर हे नाव परिचित आहे. पालिका विरोधी पक्ष नेता ते खासदार असा प्रवास पिंपरी चिंचवडच्या लोकांनी जवळून पाहिलाय.
1 मार्च 1943 रोजी जन्मलेल्या गजानन बाबर यांनी सुरुवातीची वर्ष अतिशय संघर्षात घालवली. पण शिवसेनेच्या स्थापनेनंतर बाळासाहेबांच्या नेतृत्वानं भारावून जात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी केवळ शिवसेनेचा प्रसारच केला नाही, तर नगरसेवक ते विरोधी पक्षनेता अशी भरारीही घेतली.
2009 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघात झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे गजानन बाबर यांना ३ लाख ६४ हजार ८५७ एवढी मते मिळाली. तर राष्ट्रवादीचे आझम पानसरे यांना २ लाख ८४ हजार २३८ मते मिळाली होती. गजानन बाबर यांनी तब्बल ८० हजार ६१९ मतांनी पानसरेंचा पराभव करत लोकसभा गाठली.
1995 पासून राजकारणात प्रवेश करणा-या खासदार गजानन बाबर यांच्या नावावर एकाही गुन्ह्याची नोंद नाही. खासदार बाबर यांची एकुण मालमत्ता ही 6 कोटी 78 लाख 31 हजार 434 रूपयांची आहे. यांपैकी 5 कोटी 83 लाख रूपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर 95 लाख 31हजार 434 रूपयांची जंगम मालमत्ता बाबर यांच्या नावे आहे.
बाबर यांच्याबाबत मतदारसंघातील जनमत जरी चांगलं असलं तरी त्यांना स्वपक्षीयांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळवण्यासाठी शिवसेनेमध्ये जोरदार चुरस आहे. खासदार गजानन बाबर आणि श्रीरंग बारणे यांच्यात शिवसेनेकडून तिकीट कोणाला दिलं जातं हे पाहणं रंजक असणार आहे. बाबर यांना मात्र पुन्हा एकदा आपल्यालाच लोकसभेचं तिकीट मिळेल असा विश्वास आहे.
मतदारसंघातील समस्या
मावळ मतदारसंघाला विविध समस्यांनी ग्रासलंय. खासदार गजानन बाबर यांचा पिंपरी चिंचवडवर प्रभाव असल्यानं हा भाग वगळता मतदारसंघातील अन्य विभाग दुर्लक्षितच राहिले. खासदार बाबर यांनी कोणत्याही स्थानिक समस्येसाठी रस्त्यावर उतरण्याचं धोरण ठेवलं. आणि नेमकी हीच बाब त्यांच्यावर टीकेसाठी कारणीभूत ठरली. गजानन बाबर यांनी स्थानिक प्रश्नांकडे