काय म्हणावं याला, लहान मुलांपासून प्रौढांना उलटं टांगलं जातंय!

By Surendra Gangan | Last Updated: Wednesday, November 6, 2013 - 23:57

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
२१ व्या शतकामध्ये भारतानं मंगळावर उपग्रह पाठवून विज्ञानाच्या क्षेत्रातली प्रगती सिद्ध केलीय.. पण मंगळावर जाणा-या देशात अजून काय सुरू आहे, त्याची ही धक्कादायक बातमी. बाबीर बुवाचा नवस फेडण्यासाठी लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत सगळ्यांना उलटं टांगलं जातंय.
पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात सध्या बाबीर बुवाची जत्रा सुरू आहे. बाबीर बुवाचा नवस फेडण्यासाठी लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत सगळ्यांना उलटं टांगलं जातं. पायाला दोरी बांधून त्यांना उलटं टांगून भिंतीवरुन खाली सो़डलं जातं. या जत्रेला पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नाशिकसह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून लाखो भाविक येतात.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
पाहा व्हिडिओFirst Published: Wednesday, November 6, 2013 - 23:49


comments powered by Disqus