`बलात्कार` कॉकटेल!

दिल्ली गँगरेप प्रकरण गेल्या काही दिवसांपासून गाजत असतानाच मुंबईतली एक विचित्र घटना समोर आलीय. मुंबईतल्या बांद्रामध्ये एका पबमध्ये `बलात्कार` नावानं एक कॉकटेल मेन्यूकार्डमध्ये आपलं स्थन निश्चित करून आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 1, 2013, 08:21 PM IST

दिल्लीमधील बलात्काराची घटना ही समस्त तरुणाईच्याच नव्हे देशाच्या संतापाचा विषय ठरली आहे. या बलात्काराविरोधात सरकारविरोधात तरूण एकत्र आले आसताना राष्ट्रपतीपुत्राने महिला रात्री डिस्कोत जातात, आणि दिवसा आंदोलन करतात, असा टोमणा मारला होता. या बलात्कारावर संताप व्यक्त होत असताना या घटनेचा कुणी वापर कसा करून घेऊ शकतो? मात्र मुंबईत अशी घटना घडली आहे.

दिल्ली गँगरेप प्रकरण गेल्या काही दिवसांपासून गाजत असतानाच मुंबईतली एक विचित्र घटना समोर आलीय. मुंबईतल्या बांद्रामध्ये एका पबमध्ये `बलात्कार` नावानं एक कॉकटेल मेन्यूकार्डमध्ये आपलं स्थन निश्चित करून आहे.
पण ग्राहकांच्या तक्रारीनंतर पबच्या मॅनेजरकडून हे नाव काढून टाकणार असल्याचं सांगितलं. यासंदर्भात पब प्रशासनाकडून झी 24 तासला एक एसएमएस पाठवण्यात आलाय. त्यात मेन्यूकार्डमधून हे नाव हटवल्याचं सांगिलंय. मात्र हे नाव एका कॉकटेलला देण्यामागे आपली कुठलीही वाईट भावना नव्हती असंही या एसएमएसमध्ये म्हटलंय.