`सन ऑफ सरदार` बल्ले बल्ले

By Jaywant Patil | Last Updated: Tuesday, November 13, 2012 - 17:07

www.24taas.com, मुंबई
या दिवाळीमध्ये संपूर्ण कुटुंबासह एंजॉय करण्यासारखा सिनेमा म्हणजे सन ऑफ सरदार.. अश्विनी धीर यांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात हास्याचे फवारे उडत राहातात. संगीत आणि गीतं यांमध्ये फारसं दखल घेण्.सारखं नसलं, तरी सिनेमा नक्कीच रंगतदार आहे.
लंडनमध्ये राहाणारा जस्सी सिंग रंधवा (अजय देवगण) याला आपल्या पूर्वजांबद्दल फार कमी माहिती असते. पंजाबमध्ये आपल्या गावी पहिल्यांदाच तो येतो आणि त्याला रंधवा विरुद्ध संधू या दुश्मनीची माहिती मिळते. संधू कुटुंबाचा प्रमुख रणविजय सिंग जस्सीसोबत जुना बदला घेण्यासाठी आसुसलेला असतो. पण, गंमत म्हणजे या संधूंची एक प्रतिज्ञा असते, ती म्हणजे ‘अतिथी दवो भव’ घरात आलेल्या पाहुण्यावर ते वार करत नाहीत. आणि नेमका जस्सी त्यांच्याच घरात पाहुणा बनून येतो. रणविजय सिंगची बहीण सुख (सोनाक्षी सिन्हा) हिच्या जस्सी प्रेमात असतो. त्यामुळे रणविजय सिंग विचित्र प्रतिज्ञा करतो. ज्या क्षणी जस्सी उंबरठ्याबाहेर पाऊल ठेवेल, त्या क्षणी रणविजय जस्सीचा जीव घेईल. यातून धमाल सुरू होते. संधू वेगवेगळ्या मार्गांनी जस्सीला उंबरठ्याबाहेर आणण्याचा प्रयत्न करत असतात, तर जस्सी आपला जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो.
या कथेला तसा खरा काही अर्थ नाही. पण धमाल मसाला सिनेमा म्हणून हा सिनेमा पाहायला नक्कीच आवडेल. मुळे १९२३ साली आलेल्या ‘अव्हर हॉस्पिटॅलिटी’ आणि त्यावर आधारीत दक्षिण भारतीय ‘मर्यादा रमणा’ या सिनेमांचं सन ऑफ सरदार हे हिंदी रूप आहे. अर्थात, डोकं बाजूल ठेवून हा सिनेमा पाहिला, तर पुरेपूर पैसा वसूल सिनेमा आहे.
जस्सीच्या भूमिकेत अजय देवगणने धमाल उडवली आहे. सुखच्या भूमिकेतून सोनाक्षीनेही सरदारनी धमाकेदार रंगवली आहे. संजय दत्त आणि जुही चावला यांच्यातील सीन्स म्हणजे जबरदस्त हास्याचे ऍटमबॉम्बच आहेत. याशिवाय मुकुल देव आणि विंधू दारा सिंग यांच्या भूमिकाही मजेदार आहेत. एकूणच हा सिनेमा दिवाळीत एंजॉय करण्यासारखा आहे.

First Published: Tuesday, November 13, 2012 - 17:07
comments powered by Disqus