बेगम करीना

सैफ - करीनाची प्रेम कहाणी सिनेमाच्या कथेपेक्षा काही कमी नाही.कारण बॉलीवूडमधली प्रेमप्रकरणं जास्त काळ टीकत नाही हा आजवरचा इतिहास आहे...पण सैफ-करीनाने पाच वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर लग्नाच्या बेडीत अडकण्याचं निर्णय़ घेतला..पण या कपलमध्ये सर्वप्रथम प्रेमाची कबुली कुणी दिली असले असं तुम्हाला वाटतंय..सैफनी की करीनाने...

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 16, 2012, 11:54 PM IST

www.24taas.com, मुंबई
सैफ - करीनाची प्रेम कहाणी सिनेमाच्या कथेपेक्षा काही कमी नाही.कारण बॉलीवूडमधली प्रेमप्रकरणं जास्त काळ टीकत नाही हा आजवरचा इतिहास आहे...पण सैफ-करीनाने पाच वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर लग्नाच्या बेडीत अडकण्याचं निर्णय़ घेतला..पण या कपलमध्ये सर्वप्रथम प्रेमाची कबुली कुणी दिली असले असं तुम्हाला वाटतंय..सैफनी की करीनाने...
करीनाचं नाव आता बदलंल आहे...३२ वर्षीय करीनाची ओळखही बदलली आहे...करीनाच्या नाव्या नावांची अद्याक्षरे असतील K K K...
करीना कपूर खान असा या अद्याक्षरांचा अर्थ आहे..करीना कपूर आपल्या नावापुढे खान हे अडनावही लावणार आहे..बॉलीवूडमधील नावजलेलं आणखी एक अडनाव करीनाच्या नावापुढे लागल्यामुळे बॉलीवूडमधील तिचा रुतबा आणखीनच वाढलाय..
करीना-सैफच्या प्रेमाची बाब काही लपून नव्हती..सगळ्या दुनियेला त्यांच्या प्रेमाची खबर होती..आणि आता तर ते विवाह बंधनात अडकलेत...पण त्यांच्या प्रेम कहाणीची सुरुवात कुठून आणि कशी झाली या मागची कहाणी सिनेमाच्या कथेसारखीच रंजक आहे..दोघांपैकी सर्वप्रथम प्रेमाची कबुली कोणी दिली असेल असं जर कुणाला विचारलं तर नक्कीच सैफचं नाव घेतल जाईल..पण वास्तव काही वेगळं आहे..’टशन’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान करीनाने सैफकडं आपल्या प्रेमाची कबुली दिली. त्यांच्यात जवळीक वाढली होती. पण सैफने गप्प राहणं पसंत केलं. ‘टशन’ सिनेमातील एका दृश्यादरम्यान भिजलेल्या अवस्थेत करीना सैफ जवळ आली आणि ती सैफकडे प्रेमाची कबुली दिली

टशन सिनेमा दरम्यान सैफ-करीनाच्या प्रेमप्रकरणाची बातमी वणव्यासारखी बॉलीवूडमध्ये पसरली..टशन सिनेमाची शुटिंग संपल्यानंतर एका रात्री फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने मीडियाच्या प्रतिनिधींना एक हींट दिली.. एका फॅशन शो दरम्यान बॉलीवूडमधील मोठी बातमी उघड होणार असल्याचं मनिशने सांगितलं होतं..पण तो फॅशन शो सुरु होण्यापूर्वीच सैफ-करीना एकत्र येणार असल्याची खबर मीडियाला मिळाली होती..सैफ-करीना हाताहात घालून फॅशन शोसाठी हजर होते..त्यावेळी सैफने करीनाशी असलेल्या संबंधाची खुलेआम कबुली दिली..
करीनाने कधीच आपलं खासगी आयुष्य लपवून ठेवलं नाही. सैफशी असलेले संबंध तिने जास्त काळ लपवून ठेवले नाहीत. शाहीद कपूरशी असलेले संबंधही तिने कधीच लपवून ठेवले नव्हते. झी कॅफेच्या व्हॅलेंटाईन स्पेशल शो दरम्यान शाहीद करीना या प्रेमीयुगुलाने त्यावेळी ऑफिशीअल डेटींग केलं होतं. पुढे शाहिदशी तिचं ब्रेकअप झालं...पण ब्रेकअपनंतर तिने शाहीद विषयी कधीच वेडेवाकडे शब्द वापरले नाहीत..
आता करीनाच्या नावासमोर आणखी एक अडनाव जोडलं गेलंय..सैफ करीनाचं रजिस्टर पद्धतीने विवाह झाला असला तरी सैफच्या गुडगावमधील पतौडी गावातील भव्य पॅलेसमध्ये पारंपारीक पद्धतीने विवाह होणार असल्याचं बोललं जातंय..त्यावेळी करीना कोणता साज शृंगार करणार हे आता लपून राहिलं नाही..करीनाच्या लग्नाचा साजशृंगार हा ४३ वर्ष जूना असून १९६९ मध्ये शर्मिला टागोर यांनी जो साज परिधान करुन टायगर पतौडींशी निकाह केला होता तोच करीना परिधान करणार आहे..मात्र त्याची चमक वाढविण्याची जबाबदारी ड्रेस डिझायनर ऋतू कुमारवर सोपवण्यात आलीय़..सैफ करीनाच्या लग्नाची चर्चा बॉलीवूडपासून हॉलीवूड पर्यंत गेली होती...सैफच्या प्रेमात पडल्यानंतर करीनाला सैफीना हे टोपण नाव देण्यात आलं होतं..पण ही कल्पना हॉलीवूड अभिनेता ब्रॅडपीट आणि अंजलीना जोली यांच्यावरुन घेण्यात आली होती..अंजिलीनाला हॉलीवूडमध्ये ब्रांजिलीना हे टोपण नाव देण्यात आलंय...जेव्हा सैफ-करीनाच्या लग्नाची खबर हॉलीवूड जोडप्याला मिळाली तेव्हा त्यांनीही सैफ-करीनाला शुभेच्छा दिल्या होत्या..
रिअल लाईफमध्ये सैफ- करीनाला त्यांच्या चाहत्यांनी पसंत केलं खरं पण रील लाईफमध्ये मात्र त्यांना प्रेक्षकांनी म्हणावं तेवढं स्वीकारलं नाही...त्यामुळेच या दोघांनी एकत्रित जेवढे सिनेमे केले त्यातल्या कुठल्याच सिनेमाला बॉक्स ऑफिसवर यश मिळवता आलं नाही..

पण त्यांच्या रिअल लाईफ पेक्षा रिल लाईफचा विचार केल्यास या जोडीला म्हणावं तेव्हडं यश मिळालं नाही... मग तो सिनेमा रोमॅन्टीक असो की एक्शन प्रेक्षकांनी त्यांच्या सिनेमाकडं पाठ फिरवली... सैफ - करीनाची रिअल लाईफ मधली केमिस्ट्री रिल लाईफमध्ये म्हणावं तेव्हडं यश मिळवू शकली नाही... एजन्ट विनोद हा सिनेमा प्रदर्शनापुर्वीच गाजला होता तो सैफ आणि करीना यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीच्या उत्सुकतून.. त्यावेळी सैफ - करीनाच्या लग्नाबद्दल सा-यांनाच उत्सुकता होती.. या चित्रपटात करीनाचे एक्शन सीन आणि खास मुजरा सॉंगही