भोंदूबाबापासून सावधान!

By Jaywant Patil | Last Updated: Thursday, April 11, 2013 - 07:54

समस्या सोडविण्याची बतावणी करून भोळ्याभाबड्या महिला आणि पुरूष भक्तांना फसविणा-या दोन भोंदू बाबांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केलीय. या भोंदूबाबांकडून तब्बल 56 तोळे सोनं पोलिसांनी जप्त केलंय. कोल्हापूरच्या बाबुजमाल दर्ग्यामध्ये सोन्याचे दागिने मांडून पूजा केल्यास इच्छित फळ मिळतं असं सांगून शकील उर्फ जमील मुजावर आणि त्याचा साथीदार युनुस उर्फ मुन्ना इस्माईल कागदेला मिळून महिला आणि पुरुषांना फसवत होते.
अंगावरचे दागिने जप करण्यासाठी दर्ग्यात ठेवल्यास तुमची मनोकामना पूर्ण होईल अशी बतावणी शकिल उर्फ बंटी जमील मुजावरने केली होती..त्याच्यावर विश्वास ठेवून काही महिलांनी आपले दागिने त्याच्याकडं दिले...पण नंतर आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं..पोलिसांनी वेळीच कारवाई करुन ५६ तोळे दागिने हस्तगत केलेत...
शकिल उर्फ बंटी जमील मुजावर आणि युनूस उर्फ मुन्ना इस्माईल कागदे या भोंदू जोडगोळीने अनेकांना हातोहात फसवलय आणि त्यामुळेच कोल्हापूर पोलिसांनी त्यांना अटक केलीय..या दोघांनी लोकांना गंडवण्यासाठी एक वेगळीच शक्कल शोधून काढली होती..कोल्हापूराती बाबुजमाल दर्ग्यात सोन्याचेदागिने मांडून पुजा केल्यास मनोकामना पूर्ण होते असा बनाव शकिलने रचला होता... शकिल गेल्या तीन वर्षापासून या दर्ग्यात बाबा म्हणून परिचित होता.त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आठ महिलांनी त्याच्याकडं पुजेसाठी आपले दागिने दिले...
काही महिलांनी शकिलकडं आपल्य़ा दागिन्यांसाठी तगादा लावला..आणि त्यानंतर तो तेथून पसार झाला. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी शकिल आणि त्याचा साथिदार युनूस या दोघांना अटक केली..तसेच त्याच्याकडून ५६ तोळे सोन्याचे दागिने जप्त केलेत...मनोकाना पूर्ण करण्याच्या नावाखाली महिलांचे दागिने हाडप करण्याचा या भोंदूंचा डाव होता...मात्र पोलिसांनी तो हाणून पाडलाय..
अंगावर पांढरेशुभ्र वस्त्र... कपाळावर भलामोठा गंध..... आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा ....हा आहे शिवकुमार शर्मा....वर्तमान,भूत , भविष्य असा त्रिकाल ज्ञानी असल्याचा दावा शिवकुमारने केला होता..लोकांच भविष्य सांगणा-या शिवकुमारला मंगळवारी आपल्या नशिबात काय लिहून ठेवलं याची जराही कल्पना नव्हती... नागपूरच्या हुडकेश्वर पोलिसांनी शिवकुमार राहात असलेल्या ठिकाणी छापा मारला आणि त्याला ताब्यात घेतलं...पोलिसांना पाहून शिवकुमारच्या चेह-याचा रंग उडला होता...कारण त्याची भोंदूगिरी उघडं झाली होती... पुंडलिक निमसे यांना गंडवण्याचा प्रयत्न या भोंदूने केला होता...निमसे यांच्या पत्नीचा कॅन्सर बरा करण्याचा दावा शिवकुमारने केला होता...
निमसे यांना शिवकुमारवर संशय आला आणि त्यांनी अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडं तक्रार केली...या प्रकरणी पोलिसांकडं तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी भोंदू शिवकुमारच्या मुसक्या आवळल्या. बिहारचा रहिवासी असलेला शिवकुमार गेल्या तीन महिन्यापासून नागपूरात मुक्कामी होता.

कोणतीही समस्या तंत्रमंत्राच्या सहाय्याने दूर करण्याचा दावा शिवकुमार करत असे. त्याचे शिष्य गरजूंना आपल्या जाळ्यात ओढत असतं...शिवकुमार लोकांना मंत्राने भारलेल तावीज किंवा खिळा देत असे आणि त्या बदल्यात हजारो रुपये उकळत असे...पोलिसांनी त्यांच्याकडून मोठ्याप्रमाणात रोकड जप्त केलीय...तसेच तावीज आणि खिळेही जप्त केले आहेत.

First Published: Wednesday, April 10, 2013 - 23:41
comments powered by Disqus