भाजपची अशी ही बनवाबनवी...

ठाण्याचे माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर यांनी आपण कर्नाटकात हवापालटासाठी आलो आहोत आणि कुटुंबीयांच्या संपर्कात आहोत, असं सांगितलं होतं. मात्र केवळ कुटुंबियच नव्हे, तर स्थानिक भाजप नेत्यांच्याही ते संपर्कात असल्याचे पुरावे झी मीडियाच्या हाती आलेत. त्यामुळे ठाण्यातील भाजपचे बनवाबनवीचे राजकाण पुढे आलेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 28, 2013, 10:02 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
ठाण्याचे माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर यांनी आपण कर्नाटकात हवापालटासाठी आलो आहोत आणि कुटुंबीयांच्या संपर्कात आहोत, असं सांगितलं होतं. मात्र केवळ कुटुंबियच नव्हे, तर स्थानिक भाजप नेत्यांच्याही ते संपर्कात असल्याचे पुरावे झी मीडियाच्या हाती आलेत. त्यामुळे ठाण्यातील भाजपचे बनवाबनवीचे राजकाण पुढे आलेय.
मिलिंद पाटणकर गायब झाल्यानंतर दुस-या रात्रीची, म्हणजे २४ डिसेंबरची चित्र `झी २४ तास`च्या हाती आली आहेत. यात भाजपचे कार्यकर्ते मुकेश मोकाशी यांच्या या गाडीत भाजप गटनेते संजय वाघुले पाटणकरांना लागणारं सामान लोड करत असल्याचं स्पष्ट दिसतंय. आश्चर्याची बाब म्हणजे परिवहन समितीच्या गोंधळानंतर वाघुले आणि मोकाशी यांनीच पाटणकरांवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. मात्र ज्याअर्थी पाटणकरांचं सामान वाघुले आणि मोकाशी पोहोचवत आहेत, त्याअर्थी ते कुठे आहेत याची स्पष्ट कल्पना या दोघांना असणार, असा अर्थ आता लावला जातोय.
ठाणे महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेला परिवहन समितीच्या निवडणुकीत युतीच्या पराभवाला कारण ठरलेले उपमहापौर मिलिंद पाटणकर अनेक दिवस नॉट रिचेबल होते. त्याआधी शिवसेनेचे काही नेते आणि मिलिंद पाटणकरांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. भाजपच्या भेटीनंतर मिलिंद पाटणकर नॉट रिचेबल होते. ते सापडत नसल्याने भाजपने आक्रमक पवित्रा घेतला होता. त्याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्याचा आटापिटा झाला होता. मात्र, त्यानंतर मिलिंद पाटणकर यांनी मी विश्रांतीसाठी कर्नाटकात असल्याचे फोन करून स्पष्ट केले. त्यामुळे भाजपच्या ४८ तासात त्यांना शोधून काढा या मागणीची हवाच निघून गेली. त्यानंतर नवीन वास्तप पुढे आल्याने भाजपची अशी ही बनवाबनवी पुढे आली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ