कुत्र्याचे बोर न्हाण!

By Jaywant Patil | Last Updated: Sunday, February 17, 2013 - 21:38

www.24taas.com, पुणे
लहान मुलांच्या बोर न्हाणचा कार्यक्रम तुम्ही अनेकदा पहिला असेल. मात्र, लहान मुलांप्रमाणेच घरातल्या कुत्र्यांच्या बोरन्हाणाचा कार्यक्रम तुम्ही कधी पाहिला नसेल.
या अनोख्या कार्यक्रमाचे यजमान होते पुण्यातले विनायक रासकर कुटुंबीय. त्यासाठी त्यांनी या कुत्र्यासाठी खास हलव्याचे दागिने तयार केले होते. त्यांच्यासाठी नवीन कपडे शिवले. या हौशी कुटुंबाने कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकाही छापल्या आणि अंत्यत जय्यत तयारीसह मित्रपरिवार आणि नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये हे बोर न्हाण पार पाडले.

हौसेला मोल नसंत असं म्हणतात. पण हौसेला प्राणीभेदही नसतो हे रासकर कुटुंबियांनी दाखवून दिलं. आपल्या मालकाकडून मिळालेल्या प्रेमामुळे आपण `समर्थाघरचे श्वान` आहोत, अशीच समजूत या `लकी डॉग` ची झाली असेल

First Published: Sunday, February 17, 2013 - 21:38
comments powered by Disqus