ड्रॅगनच्या कचाट्यात ब्रह्मपुत्रा

By Jaywant Patil | Last Updated: Thursday, January 31, 2013 - 23:40

www.24taas.com, मुंबई
भारत आणि चीन यांच्यात आता पुन्हा एकदा नवा वाद रंगण्याची चिन्ह झालीयत.. आणि यावेळीही कुरापत काढलीय ती चीनने.. चीन भारताला कुठलीही कल्पना न देता ब्रम्हपुत्रा नदीवर तीन नवी धरण बाधंण्याला सुरुवात केलीय.. ही धरण जर बांधली गेली तर भारताला भविष्यात फार मोठं आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि दुर्दैवानं या सा-याविषयी आपण पुर्णपणे अनभिज्ञ आहेत. चीनच्या याच कृष्णकृत्यानी भारताचा राष्ट्रीय ठेवा असलेली ब्रम्हपुत्रा नदी आता संकटात सापडलीय..
चीननं आतंरराष्ट्रीय पर्यावरण कायद्याचे उल्लघंन करताना भारताचा भविष्य़कालीन विचार न करता ब्रम्हपुत्रा नदीवर तीन हायड्रोपॉवर धरण बांधण्याची जोरदार तयारी चालवलीय.. चीन ही धऱण तिबेटत्या दागू, जायचा आणि जिक्सू या ठिकाणी बांधण्यात येतायत.. ब्रह्मपुत्रा नदीच्या मध्यावरच या धरणांचे बांधकाम करण्यात येत असल्यानं चीनचा ब्रम्हपुत्रेवरील विळखा आणखीनच घट्ट होणार आहे..
या अगोदरही चीनच्या अनेक योजना राबवण्यात येत आहेत, ज्या भारतासाठी भविष्यात अतिशय धोकादायक आहेत..तिबेटची राजधानी ल्हासापासून ३२५ किलोमीटरवर जांगमूमध्ये चीन जगातल्या सर्वात मोठ्या आणि उंच हायड्रो पॉवरच्या प्रोजेक्टला सुरुवात केलीय..
या प्रोजेक्ट अंतर्गत ब्रम्हपुत्रेवर पाच मोठी धरणं, २४ छोटी धऱण, ११ पेक्षा जास्त कालवे, तर सहापेक्षा जास्त ठिकाणी भुमिगत बंधारे यांची उभारणी करण्यात येतेय..
अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार ब्रम्हपुत्रा नदीवर सुरु असलेले हे प्रोजेक्ट जरी वेळेत पुर्ण झाले तर चीनची विजेची गरज पुर्ण भागणार आहे..आणि त्याचबरोबर ब्रम्हपुत्रेच्या प्रवाहावर चीनची पक़ड आणखीनच घट्ट होईल..
अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये यामुळे भविष्यात पाण्याची टंचाई जाणवणार आहे.. उत्तर पुर्वेमध्ये जलविद्युत प्रकल्पावर परीणाम होऊन वीजटंचाईचे मोठं संकट जाणवणार आहे. एवढच नाही तर पुरपरिस्थीती निर्माण झाल्यास चीन अतिरिक्त पाण्याचा साठा सोडेल त्यानंतर होणा-या नुकसानाला भारतालाच सामोरं जावं लागेल... पर्यावरणाचे अपरिमीत नुकसान होईल.. आणि युद्धाच्या वेळी या धऱणाचा चीन पुरेपुर वापर करुन घेईल
या सगळ्या परिणामांचा विचार करता भारताला या तीनही धऱणांवर वेळीच ठाम भुमिका घेणं आवश्यक आहे.. राजकीय दृष्ट्याही मार्चमध्ये राजकीय सत्ताबदलामुळे हा प्रश्न भारतासाठी महत्वाचा ठरलाय..

First Published: Thursday, January 31, 2013 - 23:40
comments powered by Disqus