दादा विरुद्ध बाबा

Last Updated: Tuesday, October 2, 2012 - 00:19

www.24taas.com, मुंबई
राष्ट्रवादीचे `दादा` का झालेत आक्रमक ?
काँग्रेसच्या `बाबां`ची लागणार कसोटी ?
श्वेतपत्रिकेवरून होणार आघाडीत महाभारत ?
दादा विरुद्ध बाबा

राजीनाम्यानंतर अजित पवार काय बोलणार याकडं सर्वांच लक्ष लागून राहिलं होतं...अजित पवारांनी आपल्या पहिल्याच जाहिर भाषणात आपली भविष्यातील दिशा स्पष्ट केली ... त्यांचा रोख कुणावर होता हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही.. आगामी काळात आपली वाटचाल कशी असणार आहे याची झलक रविवारी अजित पवारांच्या अकोले तालुक्यातील एका जाहिर सभेत कार्यकर्त्यांना पहायला मिळाली.. मंत्रीपदावरुन पाय उतार झाल्यानंतर पहिल्याच भाषणात त्यांनी आपली दिशा स्पष्ट केलीय.... राजीनाम्यापूर्वी आणि नंतर ज्याकाही राजकीय घडामोडी घ़डल्या त्याची किनार अजित पवारांच्या भाषणाला होती..

त्यांनी पहिल्याच भाषणात आपल्य़ा विरोधकांना थेट इशाराच देवून टाकला.. सिंचनावरुन झालेल्या आरोपामुळे अजित पवार अधिकच आक्रमक झालेत.... ही सगळी पार्श्वभूमी पहाता... आगामी काळात राज्याचं राजकारण कोणत्या दिशेनं जाणार आहे याची ही एक झलक तर नाही ना ? असा प्रश्न जनतेला पडल्याशिवाय राहणार नाही.. राज्यात आघाडी सरकार असलं तरी दोन्ही काँग्रेसमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे...संधी मिळताच एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न दोन्हीकडून केला जातोय...सिंचनप्रकरणावरुन अजित पवारांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला असला तरी मुख्यमंत्र्यासाठी आगामी काळ कसोटीचा ठरणार आहे... सिंचनप्रकरणी आरोप झाल्यानंतर अजित पवारांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला...राजीनाम्यानंतर अजित पवार बचावात्मक पवित्रा घेतील असं त्यांच्या विरोधकांना वाटलं होतं... पण काही वेगळचं चित्र पहायला मिळालं.... मंत्रीपद सोडल्य़ानंतर ते आधिकच आक्रमक झाले...आणि त्याची प्रचिती अकोलेच्या जाहिर सभेतून त्यांच्या कार्यकर्त्यांना आली...अजित पवारांनी थेट काँग्रेसच शरसंघान केलं.....

सिंचनाच्या श्वेतपत्रिकेवरुन काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच कोंडी केलीय..आणि तेच राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागलंय....प्रसिद्धी माध्यमांनी सिंचन घोटाळा लावून धरल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला बचावात्मक भूमिका घ्यावी लागली.... या सगळ्या प्रकरणात काँग्रेसने गप्प राहनं पसंत केलं...या सगळ्यापार्श्वभूमीवर अजित पवारांनी राजीनामा दिला खरा पण त्यामुळे दोन्ही काँग्रेसमध्ये कुरघोडीचं राजकारण पुन्हा एकदा समोर आलं...आघाडी सरकारमध्ये सगळं काही अलबेल असल्याचं दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगितलं जात असंल तरी अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या त्या लपून राहिल्या नाही...
भाषणाच्य़ा ओघात अजित पवार सारं काही बोलून गेले... त्यांच्या टीकेचा रोख स्पष्ट होता... राज्यात आघाडीचं सरकार असलं तरी एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी दोन्ही पक्षातील नेत्यांकडून सोडली जात नाही... महानगरपालिकेच्या निवडणुका आणि जिल्हापरिषदेच्या निवकडणुकीत हेच पहायला मिळालंय.....सिंचनप्रकरणी श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केली...आणि दोन्ही काँग्रेसमध्ये वादाला ठिणगी पडली...अजित पवारांनी याच प्रकरणातून राजीनामा दिला असला तरी आगामी काळात अजित पवार मुख्यमंत्र्यासाठी डोकेदुखी तर ठरणार नाहीत नाही अशी भीती काँग्रेसच्या गोटातून व्यक्त केली जातेय....

First Published: Tuesday, October 2, 2012 - 00:18
comments powered by Disqus