डान्स, डान्स, डान्स..

आंतरराष्ट्रीय नृत्य दिवसाच्या निमित्तानं नृत्याची आणि वैश्विक नात्यांची ही घट्ट गुंफण...

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 29, 2013, 11:50 PM IST

www.24taas.com, मुंबई
एखाद्या गाण्यावर ठेका धरला म्हणजे आपल्याला डान्स येतोच अस जस नसतं ना तसच कुठूनही कर्णमधुर संगीत कानी पडल की शास्त्रशुद्धच डोलावं अशीही काही सक्ती नसते.. नृत्य या कलाप्रकाराला खरतर कुणाच्याच मर्यादा नाहीत. .उलट प्रांतीक नृत्याबद्दल अवघ्या जगाला आदरच असतो.. प्रत्येक जणाच्या आदरानं त्या राष्ट्राचाही सन्मान होतो.. अगदी आत्ताच्या गंगम स्टाईलनेही ही गोष्ट अधोरेखित झालीय.. आंतरराष्ट्रीय नृत्य दिवसाच्या निमित्तानं नृत्याची आणि वैश्विक नात्यांची ही घट्ट गुंफण...
नृत्य.. डान्स.. आज प्रत्येक भारतीयाच्या नाही तर जगातल्या प्रत्येकाशी मनाचं वैश्विक नातं जोडणारा हा कलाप्रकार.. होय एकीकडे तेल, सिमावाद, धर्म अशा नानाविध प्रकारांनं जगात फक्त विरोधाच्या भिंती उभ्या राहत असताना, जगभरातल्या डान्स प्रकारांनी मात्र देश-परदेशातही प्रत्येक सजग मनात आपली मुळं घट्ट रोवलीय.. जगभरातल्या नृत्य प्रकारांबद्दल किती आणि बोलावं.. शब्द थिटं पडतील अस पदलालीत्य.. भुरळ या शब्दालाही क्षणक्षर मोह पडावा असा नृत्यआविष्कार आणि श्रवणीयपणाही मंत्रमुग्ध व्हावा असं मनमोहक संगीत..जागतिक नृ्त्याविष्काराचा आढावा घेतला की शब्दांच्या मर्यादा आणि कलेचा बेफामपणा ठायी ठायी दिसतो.. तासातासाला काय तर क्षणाक्षणाला संगित जगणा-या आणि नृत्यावर थिरकणा-या या कलावंतासाठी खर तर प्रत्येक क्षण हा नृत्यासाठी समर्पित असतो.. पण या तमाम नृत्यकलावंतासाठी २९ एप्रिल हा दिवस विशेष असतो.. कारण अवघं जग २९ एप्रिल हा दिवस म्हणून मोठ्या अभिमानानं साजरा करतो.. २९ एप्रिलला नृत्य दिवस साजरा करण्यामांगही एक विशेष कारण आहे.. जीन - जॉर्जेस नोव्हेर यांचा २९ एप्रिल १७२७ हा जन्मदिवस.. जीन - जोर्जेस नोव्हेर हे नाव जगभरात ओळखलं जातं ते बॅले नृत्याचे आद्य संस्थापक.... त्यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून अवघ्या विश्वानं हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर नृत्याला समर्पित केलाय..
युनेस्कोची एक सह संघटना असलेली आयटीआय म्हणजेच आंतरराष्ट्रीय थिएटर संस्था याचं आयोजन करतं.. ही संस्था संयुक्त राष्ट्राच्या शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक संघटना १९८२ पासून दरवर्षी २९ एप्रिलला आतंरराष्ट्रीय नृत्य दिन म्हणून साजरा करतंय. या दिवशी संबधित वर्षातील नर्तकाला जागतिक संदेश देण्यासाठी आमंत्रित केले जाते. सर्वोत्कृष्ट नर्तकाची निवड आयटीआयची आतंरराष्ट्रीय नृत्य समिती करते. त्या वर्षीचा लक्षवेधी नृत्यप्रकार आणि त्याच्यासाठी सन्मानित झालेला नृत्यकलावंत यांचा हा वैश्विक गौरव असतो.. आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक असलेला ही नृत्यकला राष्ट्राच्या सीमा ओलांडून प्रत्येक प्रांतात आपली घट्ट वेसण बाधंत चाललीय हे मात्र नक्की...
२९ एप्रिल म्हणजेच आंतरराष्ट्रीय नृत्य दिवसाच्या निमीत्तानं जगभरातल्या महत्वाच्या नृत्याविष्काराचा आपण आढावा घेणार आहोत..या सगळ्यात बॉलडान्सची मोहमयी दुनिया काही औरच असते.. वॉल्टझ डान्स, फॉक्सटॉर्ट, चाचाचा रुबा सांबा यासारखे बॉल डान्स जेवढे देखणे आहेत तेवढेच देखणे आहेत क्लब डान्समधील साल्सा, मेरंगे हे नृत्याविष्कार.. पाहुयात यांचा दिलखेचक अंदाज...
पाश्चिमात्य देशांच्या नृत्याविष्कारात सर्वात अग्रक्रमानं नाव येतात ती बॉलरुम डान्स या अंतर्गत येणा-या नृत्यप्रकारांची... मंद संगित आणि त्याच दिमाखदार लयीत देहाच्या होणा-या हालचाली हे या नृत्यांचे महत्वाचे वैशिष्ठ्य...
यातील सुरुवातीचा प्रकार म्हणजे वॉल्टझ डान्स.. एका मंचावर प्रकाशझोतात दिसणारे हे डान्सकपल... संगिताच्या तालावर झुलणारा हा नृत्याविष्कार एका वेगळ्याच दुनियेत नेऊन दर्शकांना सोडतो..
फॉक्सट्रॉर्ट हाही त्याच पद्धतीतला हा आविष्कार... हळूहळू गती पकडत जाणा-या या नृत्याविष्कारांने जगभरातल्या डान्सर्सवर आपली छाप सोडलीय..
असाच काहीसा पण जरा वेगवान डान्सचा प्रकार म्हणजे चाचाचा... क्युबन प्रकारातल्या या डान्सची जादू सत्तरच्या दशकापासून ते आजतागायत कायम आहे.. वेगवान पद्धतीत थिरकत जाणारा हा देह ही या प्रकाराची खासियत..
अर्जेंटिना आणि उरुग्वेची आंतरराष्ट्रीय नृत्यदेणगी म्हणजे टॅंगो नृत्याविष्कार..टॅंगो हा प्रकार टॅंगो क्रिओलो म्हणूनही ओळखला जातो.. रोमोटीसिझमची उत्तम अनुभूती या नृत्याविष्कारातून जगाला मिळते..
रुंबा- सांबा - एक वेगळी शैली आणि दिमाखात टाकली जाणारी पदलालित्याची रचना या मुळे रुंबा सांबा हा प्रकारही लक्षणीय मानला जातो... संगीताच्या ठेक्यावर दिमाखात रुंबा आणि सांबा या दोहोंचे विलक्षण मिश्रण आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगलीच